पाकिस्तानात पोलिओ लसीकरण मोहीम ठप्प, चार कोटी बालके डोसपासून वंचित


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : कोविडच्या उद्रेकामुळे एप्रिल आणि जून महिन्यात पाकिस्तानातील सुमारे चार कोटी बालके पोलिओच्या डोसपासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती यूनिसेफने दिली आहे. कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले पाहता देशातील पोलिओ लसीकरण मोहीम स्थगित करण्यात आली आहे.
२०२० मध्ये पाकिस्तानात ८३ मुलांना पोलिओ झाला तर त्याचवेळी २०१९ मध्ये १४७ पोलिओ रुग्ण आढळून आले होते. परंतु पोलिओचा डोस दिल्यानंतर काही बाळांत वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली. Polio vaccination campaign stalled in Pakistan, four crore children deprived of dose

परिणामी २०१९ मध्ये २२ जण तर २०२० मध्ये १२१ जण आजारी पडले. पोलिओ डोसबाबत असलेले गैरसमज आणि घडणाऱ्या घटना यामुळे पाकिस्तानातील अनेक भागातील पालक हे आपल्या मुलांना पोलिओचा डोस देण्याबाबत उत्सुक नाहीत.



या भागात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम नसून समुदायात जनजागृतीचा अभाव असल्याचे युनिसेफने अहवालात म्हटले आहे.गेल्यावर्षी यूनिसेफकडून पाकिस्तानातील अति जोखमीच्या ठिकाणी आरोग्य मोहीम राबवली गेली. नॅशनल इमर्जन्सी ऑपरेशन्स सेंटरच्या अंतर्गत यूनिसेफने २०२० मध्ये १४ वेळेस पोलिओ अभियान राबवले. ३९ दशलक्ष लाभार्थ्यांपैकी ९७.८ टक्के मुलांना पोलिओचा डोस देण्यात आला. जगातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याचे ध्येय गाठण्यासाठी पाकिस्तानात मोहीम राबवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली, असे सौदी गॅझेटने म्हटले आहे.

Polio vaccination campaign stalled in Pakistan, four crore children deprived of dose

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात