कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांच्या विरुद्ध एफआरआय दाखल करण्यास पोलिसांनी दिला नकार, सामाजिक कार्यकर्ते जाणार कोर्टामध्ये


विशेष प्रतिनिधी

बंगलोर : कर्नाटकमध्ये सामाजिक कार्यकर्ते आर मानसैया यांनी मुख्यमंत्री बसवराज बोमई, विधान सभा सभापती आणि राज्याचे गृहमंत्री यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी ही तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. विधानसभेच्या विवादास्पद धर्मांतरविरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान भाजप नेत्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना कमी लेखले, असा आरोप या सामाजिक कार्यकर्यांनी केला आहे.

Police refuse to file FIR against Karnataka Chief Minister Basavaraj, social activists will go to court

पैशाचे आमिष दाखवून ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या वर्गातील लोकांना भिकारी आणि भटके असे भाजप नेत्यांतर्फे संबोधित करण्यात आले होते, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. पोलिसांनी एनडीटीव्ही सोबत बोलताना, ही घटना राज्याच्या विधानसभेत घडली आहे त्यामुळे तक्रार नोंदवू शकत नाही. असे विधान केले आहे.


भाजपचे सर्व पोपट सतत टिवटिव करत असतात. ते आता गप्प का आहेत? कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा ; शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत


यादरम्यान कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राजमंत्री के एस ईश्वरप्पा यांनी म्हटले आहे की, ‘हे विधेयक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे, बाकी काही नाही.’ तर सामाजिक कार्यकर्ते आर मानसैया यांनी आता ह्या संबंधी कोर्टाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

Police refuse to file FIR against Karnataka Chief Minister Basavaraj, social activists will go to court

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात