पंतप्रधान मोदींचा आज आसाम दौरा, AIIMS आणि 3 वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्घाटनासह 14300 कोटींच्या योजनांची भेट देणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवारी आसामच्या एक दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते आसामला सुमारे 14,300 कोटी रुपयांच्या योजनांची भेट देणार आहेत. ते अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), गुवाहाटी आणि आसाममधील इतर 3 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करतील. येथेच ते ‘आपके द्वार आयुष्मान’ मोहिमेचा शुभारंभ करतील.PM Modi’s visit to Assam today, to visit 14300 crore schemes including inauguration of AIIMS and 3 medical colleges

यावेळी ते गुवाहाटी येथील सरूसजाई स्टेडियममध्ये बिहू नृत्याच्या विश्वविक्रमाचे साक्षीदारदेखील होतील, जिथे 11 हजारांहून अधिक कलाकार एकाच वेळी बिहू नृत्य सादर करतील.



आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान ‘आसाम अॅडव्हान्स्ड हेल्थ केअर इनोव्हेशन इन्स्टिट्यूट’, पलाशबारी आणि सुआलकुची यांना जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील पूल आणि शिवसागरमधील ‘रंग घर’च्या सुशोभीकरण कामाची पायाभरणी करतील. पंतप्रधान दुपारी आसामला पहिले एम्स देतील. एम्स, गुवाहाटी आणि कॅम्पसची पाहणी केल्यानंतर ते एका सार्वजनिक समारंभात एम्स, गुवाहाटी आणि इतर 3 वैद्यकीय महाविद्यालये राष्ट्राला समर्पित करतील. केंद्राकडून 1,123 कोटी रुपये खर्चून एम्स बांधण्यात येत असून त्यात 1000 खाटांचे रुग्णालय आणि 100 एमबीबीएसच्या जागा असतील.

एम्स कॅम्पसमधून राज्य सरकारने बांधलेल्या नलबारी (615 कोटी रुपये), नागाव (560 कोटी रुपये) आणि कोक्राझार (535 कोटी रुपये) येथील 3 वैद्यकीय महाविद्यालयांचे मोदी व्हर्च्युअली उद्घाटन करतील. IIT गुवाहाटी कॅम्पसमध्ये IIT गुवाहाटी आणि आसाम सरकार यांनी 600 कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह संयुक्तपणे विकसित केलेल्या संशोधन रुग्णालयाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की मोदी व्हर्च्युअली 1.1 कोटी लोकांना हेल्थ कार्ड वितरीत करतील, ज्यांना दरवर्षी 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळेल. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाच्या समारोप समारंभाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान 3 प्रकल्पांचे व्हर्च्युअली उद्घाटन करतील. पहिला आसाम पेट्रो-केमिकल्स लिमिटेड (APL) द्वारे दिब्रुगढमधील नामरूप येथे 500 टन प्रतिदिन (TPD) क्षमतेचा मिथेनॉल प्लांट आहे, जो रु. 1,709 कोटी गुंतवणुकीने बांधला गेला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते तिसरा आणि सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे ब्रह्मपुत्रेवरील पलासबारी-सुलकुची पूल आहे.

सरमा म्हणाले, संध्याकाळी तेथे बिहू नृत्य होईल जेथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत 11,010 नर्तक आणि ढोलकी वादक बिहू गाण्याच्या तालावर ठेका धरताना दिसतील. हे सर्वात मोठे लोकनृत्य सादरीकरण म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.

PM Modi’s visit to Assam today, to visit 14300 crore schemes including inauguration of AIIMS and 3 medical colleges

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात