महाराष्ट्र, पंजाबमधील कोरोना रोखण्यासाठी मोदींनी दिला कानमंत्र, पंचसूत्रीचा वापर करण्याचे आदेश

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचे असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना रोखण्यास जनआंदोलन आणि लोकसहभाग सुरू ठेवण्याची गरज व्यक्त केली. तसेच संसर्ग रोखण्यासाठी ‘पंचसूत्री’चा वापर करण्यास त्यांनी सांगितले. PM Modi takes review of covid situation

कोविड चाचणी, रुग्णांचा शोध, उपचार, कोविड प्रतिबंधासाठी योग्य वर्तन आणि लसीकरण या पंचसूत्रीचा वापर केला, तर कोरोनाचा कोप प्रभावीपणे रोखता येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त‌ केला.


नंदीग्राममधून निवडणूक लढविणे ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका


‘कोरोनाच्या रुग्णांचा शोध आणि प्रतिबंधित क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक यांची मदत घेऊन, ज्या ठिकाणी रुग्णाची अधिक संख्या आहे, तिथे कडक उपाययोजना करा.

महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड या राज्यांतील स्थिती चिंताजनक आहे. तिथे तज्ज्ञांची पथके पाठवा. रग्णसंख्या वाढण्याचे प्रमुख कारण हे मास्कचा वापर, सामाजिक अंतराचा नियम आणि कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन हेच आहे. कोविडसंबंधी नियमांचे पालन हाच प्रसार रोखण्याचा उपाय आहे,’ असेही ते म्हणाले. या बैठकीत देशातील लसीकरण, त्याचे उत्पादन याचाही आढावा घेण्यात आला.

PM Modi takes review of covid situation

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*