करूणानिधी, एमजीआर, एनटीआर, पवारांची सरकारे काँग्रेसकडून बरखास्त, मोदींचा राज्यसभेत विरोधकांना प्रखर आरसा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात भीतीचे वातावरण आहे. लोकशाही नाही. केंद्र सरकार विविध राज्य सरकारांवर अन्याय करतेय, अशी आरोपांची फटाक्यांच्या माळ लावणाऱ्या काँग्रेस आणि सर्व विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत प्रखर आरसाच दाखविला. pm modi showed the mirror to all opposition parties sitting with the congress today, that congress dislodged their governments in past

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी काँग्रेस सरकारांचा कच्चा चिठ्ठाच सदनात खोलून दाखविला. राज्य सरकारांवर केंद्र सरकार अन्याय करत असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने ६० वेळा घटनेच्या ३५६ कलमाचा गैरवापर करून अनेक विरोधकांची राज्य सरकारे बरखास्त केल्याची आठवण मोदींनी करवून दिली. त्यांच्या या तडाख्यातून कोणीही सुटले नाही. द्रमूक, अण्णा द्रमूक, कम्युनिस्ट, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलुगु देशम या सर्व पक्षांना मोदींनी आज ठोकून काढले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आम्हाला काँग्रेसवाले फेडरल सरकारांची शिकवणी देत आहेत. पण त्यांचीच केंद्रात सरकारे असताना पंतप्रधान नेहरू आणि इंदिरा गांधींनी ३५६ कलमाचा गैवापर करून कम्युनिस्टांचे सरकार पाडले होते. तामिळनाडूत करूणानिधी, एम. जी. रामचंद्रन, आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव महाराष्ट्रात शरद पवार या मोठ्या नेत्यांची सरकारे काँग्रेसच्या केंद्र सरकारांनी बरखास्त केली होती. आज त्यापैकी द्रमूक, कम्युनिस्ट आणि शरद पवार त्याच काँग्रेसच्या बाजूला बसले आहेत.

सगळ्यांन एकाच व्यक्तीविरूद्ध म्हणजे मोदींविरूद्ध जमावडा केला आहे. पण त्यांना मला हरविणे जमणार नाही. कारण जनतेचा मला आशीर्वाद आहे, असा जबरदस्त प्रहार पंतप्रधान मोदींनी केला. त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांची एकजूट उधळून लावली.

pm modi showed the mirror to all opposition parties sitting with the congress today, that congress dislodged their governments in past

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात