राज्यसभेत मोदींनी सरकारच्या कामगिरीचा डंका वाजवूनच घेतला, तर विरोधकांच्या घोषणाबाजीचा उपयोग काय झाला??


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अदानी – हिंडेनबर्ग मुद्दयावर काँग्रेससह बाकीच्या विरोधकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरल्यानंतर काल मोदींनी लोकसभेत राहुल गांधी अथवा गौतम अदानी यांची नावे एकदाही न घेता काँग्रेस आणि विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली. त्यांचा प्लॅस्टिकच्या जॅकेटमधला फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यामुळे राहुल गांधीचे परवाचे जोरकस भाषण राजकीय अर्थाने वाया गेले. opposition slogans tried to intrupt pm narendra modi, but modi continued his speech

त्यामुळे पंतप्रधान मोदी आज राज्यसभेत उत्तर देताना विरोधकांनी वेगळी रणनीती आखली. काँग्रेससह सर्व विरोधकांनी जोरजोरात घोषणाबाजी करून पंतप्रधानांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेत विरोधकांनी अखंड घोषणाबाजी सुरू ठेवली. मोदी- अदानी भाई भाई, बंद करो, बंद करो, भाषणबाजी बंद करो, अदानी के बारे मे कुछ तो बोलो अशा अनेक घोषणा विरोधकांनी दिल्या.

पण विरोधकांची ही रणनीती ओळखून पंतप्रधान मोदींनी आपले भाषण सुरूच ठेवले. विरोधकांच्या घोषणाबाजीला नंतर सत्ताधारी बाकांवरून मोदी – मोदीच्या घोषणांनी प्रत्युत्तर मिळाले. त्यामुळे विरोधकांनी रणनीती बदलून घोषणाबाजी केली, तरी त्याचा फार फायदा झाला नाही.

मोदींनी आपले भाषण सुरूच ठेवून आपल्या सरकारची कामगिरी राज्यसभेतील भाषणाच्या रेकॉर्डवर आणली. देशातल्या लाभार्थी वर्गाला १०० टक्के लाभाची रणनीती म्हणजेच खरी पंथनिरपेक्षता असा नवा अर्थ सांगितला. भारताची अर्थव्यवस्था प्रगतीकडे निघाल्याचा निर्वाळा दिला.

मोदींनी अदानींबाबत बोलावे, याच्या घोषणा विरोधी सदस्य सगळा वेळ देत राहिले, पण मोदी आपल्या भाषणाचा सर्व भर विकासाच्या मुद्द्यांवरच देत राहिले. आदिवासी, दलित, वंचित, अल्पसंख्याक ही भाषा वापरून काँग्रेसने नेहमीच दिशाभूल केली. पण आम्ही लाभार्थी व्यक्तींना योजनांचा १०० टक्के लाभाचे लक्ष्य पूर्ण करून तुष्टीकरणाचे त्यांचे राजकारण संपवून टाकले, याकडे मोदींनी लक्ष वेधले. पण सरकारची कामगिरी डंके की चोटपर वाजवून घेताना मोदींनी काँग्रेसने ३५६ कलमाचा कसा गैरवापर केला, त्याचा कच्चा चिठ्ठाच मोदींनी खोलला.

opposition slogans tried to intrupt pm narendra modi, but modi continued his speech

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात