राज्यसभेत मोदींच्या भाषणात विरोधकांच्या घोषणाबाजीचे अडथळे, पण समाजातील लाभार्थ्यांना १०० % लाभाचा पंतप्रधानांचा निर्धार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काल लोकसभेत भरपूर फटकेबाजी सहन करावी लागलेल्या विरोधकांनी आज पंतप्रधानांच्या भाषणात सतत घोषणाबाजी करून राज्यसभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तरीही मोदींनी या घोषणाबाजीत देखील कालचीच राजकीय फटकेबाजी राज्यसभेतही करून घेतली. Prime Minister Shri narendramodi ji’s reply to the Motion of Thanks on President’s Address in the RajyaSabha today.

काँग्रेससह सर्व विरोधी सदस्य अदानी – मोदी भाई भाई, हमे चाहिए जेपीसी, मोदी जी कुछ तो बोलो, अशी घोषणाबाजी करीत राहिले आणि पंतप्रधान मोदी आपल्या भाषणातून काँग्रेसवर प्रहार करीत राहिले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, की काँग्रेसनं ६ दशके देशाचे वाटोळे केले. देशाच्या प्रश्नांवर कायमचे शाश्वत उत्तरे शोधण्याचा काँग्रेसने कधीच प्रयत्न केला नाही. 60 वर्षात काँग्रेसने देशात खड्डेच खड्डे खोदून ठेवले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात केली.

मागील 9 वर्षात आम्ही देशातील अडचणींवर कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अडचणींना घाबरून आम्ही पळून जाणारे नाही. त्यावर उपाय शोधणारे आहोत. देशाच्या प्रश्नांवर आम्ही नेहमीच कायमची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. देशात कमळ फुलवण्यात विरोधकांचं मोठं योगदान आहे. विरोधकांकडे फक्त चिखल होता. आमच्याकडे फुल. त्यांच्या चिखलात आमचे कमळ फुलले.

राज्यसभेत विरोधकांच्या गोंधळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण सुरुच ठेवले. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, खर्गे जी म्हणतात, मी त्यांच्या कलबुर्गी मतदारसंघात वारंवार दौरा करतो. ते बरोबर बोलतात. पण खर्गेजींना हे दिसत नाही, की फक्त कर्नाटकमध्ये १ कोटी 70 लाख जनधन बँक खाती उघडली आहेत. इतकेच नाही, त्यांच्याच कलबुर्गी मतदारसंघात ८ लाखांपेक्षा जास्त जनधन खाती उघडली आहेत. आता तिथे इतकी जनधन खाती उघडली असतील, लोक इतके जागृत होत असतील तर इतक्या वर्षानंतर कुणाचे खातेच बंद होत असेल तर काय करायचे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरगे यांना लगावला.

Prime Minister Shri narendramodi ji’s reply to the Motion of Thanks on President’s Address in the RajyaSabha today.

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात