वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात आपले विचार मांडणार आहेत. त्यासाठी जनतेने कल्पना सुचवाव्यात, असे आवाहन केले आहे. Pm modi mann ki baat 82nd episode on 24 october 11 pm ; invite you all to share your ideas : Narendra Modi
पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा हा ८२ वा भाग आहे. हे कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ (AIR), दूरदर्शन, AIR न्यूज आणि मोबाईल अॅपच्या संपूर्ण नेटवर्कवर देखील प्रसारित केले जातील. खुद्द पंतप्रधानांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. ” भागासाठी आपल्या कल्पना सांगण्यासाठी मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो,” असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
This month, the #MannKiBaat programme will take place on the 24th. I invite you all to share your ideas for this month’s episode. Write on the NaMo App, @mygovindia or dial 1800-11-7800 to record your message. https://t.co/QjCz2bvaKg — Narendra Modi (@narendramodi) October 16, 2021
This month, the #MannKiBaat programme will take place on the 24th. I invite you all to share your ideas for this month’s episode. Write on the NaMo App, @mygovindia or dial 1800-11-7800 to record your message. https://t.co/QjCz2bvaKg
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2021
मन की बात हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मासिक रेडिओ कार्यक्रम आहे, जो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. हा कार्यक्रम पहिल्यांदा ३ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रसारित झाला. जानेवारी २०१५ मध्ये, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनीही मोदींसोबत कार्यक्रमाला उपस्थित राहून भारतीयांच्या पत्रांना उत्तरे दिली होती. पण या महिन्यात हा कार्यक्रम शेवटच्या रविवारच्या आधीच प्रसारित केला जाईल. तुम्ही हा कार्यक्रम रेडिओ, टिव्ही किंवा यूट्यूबवर ऐकू शकता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App