मोदी, नड्डा, शहा उत्तर प्रदेश मोहीमेवर : मोदी कानपूरात, नड्डा हापुरमध्ये शहा हरदोईत!!

वृत्तसंस्था

कानपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीनही भाजपचे वरिष्ठ नेते सध्या उत्तर प्रदेशच्या राजकीय मोहिमेवर आहेत. PM Modi, J. P. Nadda and Amit Shah in Uttar Pradesh today

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कानपूरमध्ये आयटी पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग नोंदविला. त्याच प्रमाणे त्यांनी कानपूरच्या मेट्रोचे उद्घाटन करून मेट्रो मधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासमवेत काही वेळ प्रवास केला. कानपूरमध्ये आयआयटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी स्टार्टअप कार्यक्रमावर भर दिला. देश गेल्या सहा महिन्यांमध्ये स्टार्टअपचा मोठा हब बनला आहे. तरुणांनी यामध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला संपूर्णपणे स्वतःच्या बाजूने वळण देण्याचा हा काळ आहे. या काळात तरुणांनी उद्योग उभारणी करणे ही भविष्यातील पुढच्या तीस-पस्तीस वर्षातली पेरणी असेल, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी कानपूर आयआयटीमध्ये काढले. त्यानंतर त्यांनी कानपूर मेट्रोचे उद्घाटन केले गेल्या गेल्या महिनाभरात ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा महत्त्वाचा उत्तर प्रदेश दौरा आहे.

जे. पी. नड्डा हे हापुर मध्ये आहेत. हापुर मध्ये त्यांनी भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करण्याबरोबरच मोठ्या मेळाव्याला देखील संबोधित केले आहे. अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधताना जे. पी. नड्डा यांनी त्यांना स्वतःच्या परिवाराखेरीज दुसऱ्या कोणत्याही विकास दिसत नाही, असे टीकास्त्र सोडले आहे.



तर हरदोई मध्ये अमित शहा यांनी समाजवादी पक्षाची स्वतंत्र एबीसीडीची व्याख्या सांगितली आहे. समाजवादी पक्षासाठी ए आतंकवाद, बी म्हणजे भाई भतिजा वाद, सी म्हणजे करप्शन आणि डी म्हणजे दंगा अशी त्यांची व्याख्या आहे, असे टीकास्त्र अमित शहा यांनी सोडले आहे. अखिलेश यादव यांच्या राजवटीत संपूर्ण उत्तर प्रदेशात तब्बल सातशे ठिकाणी दंगे झाले याची आठवण जे. पी. नड्डा यांनी करून दिली.

देशभरात कोरोना आणि ओमायक्रोनची साथ वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये निवडणुका घ्यायच्या की नाहीत याविषयी निवडणूक आयोगाचा खल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष मात्र निवडणूक तयारीत कोठेही मागे राहताना दिसत नाहीत. भाजपचे तीनही प्रमुख नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यामुळेच उत्तर प्रदेशावर आपले लक्ष राजकीयदृष्ट्या केंद्रित केल्याचे दिसत आहे.

PM Modi, J. P. Nadda and Amit Shah in Uttar Pradesh today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात