peoples padma awards : देशातील प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांसाठी (Padama Awards) पंतप्रधार नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रविवारी ट्विटरवर जनतेला खास आवाहन केले आहे. पीएम मोदींनी लोकांना तळागाळात समाजासाठी असाधारण काम करत असलेल्या लोकांना पद्म पुरस्कारासाठी नामनिर्देशित करण्याचे आवाहन केले आहे. pm modi appealed to nominate for peoples padma awards to those who are working on ground level
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांसाठी (Padama Awards) पंतप्रधार नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रविवारी ट्विटरवर जनतेला खास आवाहन केले आहे. पीएम मोदींनी लोकांना तळागाळात समाजासाठी असाधारण काम करत असलेल्या लोकांना पद्म पुरस्कारासाठी नामनिर्देशित करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत लिहिले की, ”भारतात खूप प्रतिभावंत लोक आहेत. जे तळागाळात जाऊन उत्तम काम करत आहेत. तुम्ही अशा प्रेरणादायी व्यक्तींना ओळखता का? तुम्ही अशा लोकांना पीपल्स पद्मसाठी (peoples padma awards) नामनिर्देशित करू शकता. 15 सप्टेंबरपर्यंत नॉमिनेशन खुले आहेत. padmaawards.gov.in”
India has many talented people, who are doing exceptional work at the grassroots. Often, we don’t see or hear much of them. Do you know such inspiring people? You can nominate them for the #PeoplesPadma. Nominations are open till 15th September. https://t.co/BpZG3xRsrZ — Narendra Modi (@narendramodi) July 11, 2021
India has many talented people, who are doing exceptional work at the grassroots. Often, we don’t see or hear much of them. Do you know such inspiring people? You can nominate them for the #PeoplesPadma. Nominations are open till 15th September. https://t.co/BpZG3xRsrZ
— Narendra Modi (@narendramodi) July 11, 2021
तत्पूर्वी, गत जून महिन्यात केंद्र सरकारकडे सांगण्यात आले होते की, ते पद्म पुरस्कारांना ‘जनतेचे पद्म’ मध्ये बदलण्यासाठी प्रतिबद्ध आहेत आणि सर्व नागरिकांना प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी नॉमिनेशन आणि सेल्फ नॉमिनेशनसहित शिफारसी करण्याचा आग्रह केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले की, प्रजासत्ताक दिन 2022च्या पूर्वसंध्येवर घोषित केल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी ऑनलाइन नामांकन किंवा शिफारसी खुल्या आहेत, याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2021 आहे.
सन 2014 पासून केंद्र सरकारने अनेक नायकांना पद्म पुरस्काराने सम्मानित केलेले आहे. गृह मंत्रालयाने सर्व केंद्रीय मंत्रालये, विभाग, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश सरकारांना, भारत रत्न आणि पद्म विभूषण पुरस्कार प्राप्त झालेल्यांना विनंती केली आहे की, महिला, समाजातील दुर्बल घटक, एससी, एसटी इत्यादींपैकी प्रतिभाशाली व्यक्तींसाठी प्रयत्न केले जावेत.
pm modi appealed to nominate for peoples padma awards to those who are working on ground level
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App