PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 8व्या हप्त्याचे वितरण सुरू केले. स्वत: पीएम मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वत:सुद्धा अनेक शेतकर्यांच्या खात्यात ही रक्कम ट्रान्सफर केली. मिळालेल्या माहितीनुसार 8व्या हप्त्याच्या रूपात 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या हातात प्रत्येकी 2000 रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. ही रक्कम 19 हजार कोटी रुपये एवढी आहे. कार्यक्रमाची सुरुवात कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी केली. पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये अंतरिम बजेटमध्ये जाहीर करण्यात आली. ही योजना डिसेंबर 2018 पासून अंमलात आली आहे. PM Kisan Samman Nidhi beneficiary farmers have 8th installment today of 2000 Rs, PM Modi talks With Farmers
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 8व्या हप्त्याचे वितरण सुरू केले. स्वत: पीएम मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वत:सुद्धा अनेक शेतकर्यांच्या खात्यात ही रक्कम ट्रान्सफर केली. मिळालेल्या माहितीनुसार 8व्या हप्त्याच्या रूपात 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या हातात प्रत्येकी 2000 रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. ही रक्कम 19 हजार कोटी रुपये एवढी आहे. कार्यक्रमाची सुरुवात कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी केली. पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये अंतरिम बजेटमध्ये जाहीर करण्यात आली. ही योजना डिसेंबर 2018 पासून अंमलात आली आहे.
आठव्या हप्त्याची रक्कम हस्तांतरित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील शेतकरी अरविंद निषाद यांच्याशी पंतप्रधान मोदींनी संभाषण केले. अरविंद हा नमामि गंगे प्रकल्पाशी संबंधित आहेत. अंदमान निकोबार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, मेघालय यासह अनेक राज्यांतील शेतकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले.
दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वीडियो कांफ्रेंसिंग के जरिए पीएम किसान सम्मान निधि की आठवीं किस्त जारी की और 9.5 करोड़ से अधिक किसानों को 20,000 करोड़ रुपये से अधिक की राशि ट्रांसफर की। इस कार्यक्रम में केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर भी मौजूद रहे। pic.twitter.com/Xxy8OvBzo5 — ANI_HindiNews (@AHindinews) May 14, 2021
दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वीडियो कांफ्रेंसिंग के जरिए पीएम किसान सम्मान निधि की आठवीं किस्त जारी की और 9.5 करोड़ से अधिक किसानों को 20,000 करोड़ रुपये से अधिक की राशि ट्रांसफर की। इस कार्यक्रम में केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर भी मौजूद रहे। pic.twitter.com/Xxy8OvBzo5
— ANI_HindiNews (@AHindinews) May 14, 2021
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये देते. ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. दर 4 महिन्यांनी ही सन्मान रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.16 लाख कोटी वितरित करण्यात आलेले आहेत. यापूर्वी 25 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 9 कोटी शेतकर्यांना 7 वा हप्ता हस्तांतरित करण्यात आला होता.
एकूण शेतकऱ्यांची नोंदणी – 11.80 कोटी एकूण लाभार्थी कुटुंबे – 10.82 कोटी आतापर्यंत वाटप – 1.16 लाख कोटी रुपये
डिसेंबर 2018 – पहिला हप्ता – 3.16 कोटी एप्रिल 2019 – दुसरा हप्ता – 6.63 कोटी ऑगस्ट 2019 – तिसरा हप्ता – 8.76 कोटी डिसेंबर 2019 – चौथ हप्ता – 8.95 कोटी एप्रिल 2020 – पाचवा हप्ता – 10.49 कोटी ऑगस्ट 2020 – सहावा हप्ता – 10.21 कोटी डिसेंबर 2020 – सातवा हप्ता – 10.15 कोटी मे 2021 – आठवा हप्ता – 9.5 कोटी
(काही राज्यांत बनावट लाभार्थी आढळल्यानंतर संख्या कमी झाली आहे.)
रक्कम खात्यात मिळाली की नाही हे तुम्हाला बँकेच्या एसएमएसद्वारेही कळू शकते. याशिवाय https://pmkisan.gov.in/beneficiarystatus.aspx या वेबसाइटवर जाऊन आपला आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक टाकूनही निधीची स्थिती तपासता येते.
सर्वात आधी https://pmkisan.gov.in वरजा. वेबसाइवर मुख्य मेन्यूतील Farmers Corner वर क्लिक करा. येथे लाभार्थींची यादीवर क्लिक करा. यानंतर आपले राज्य, जिल्हा, गाव इत्यादी माहिती नोंदवा. यानंतर तुम्हाला गेट रिपोर्टवर क्लिक करावे लागेल. यानंतर आलेल्या यादीत तुम्ही आपले नाव चेक करू शकता.
https://pmkisan.gov.in/NewHome3.aspx# नवीन शेतकरी या लिंकला भेट देऊन नोंदणी तपासू शकतात. आधार रेकॉर्ड अद्ययावत केले जाऊ शकतात. लाभार्थी शेतकरी त्यांची स्थिती तपासू शकतात. आपण आपले नाव सुरक्षित यादीमध्ये तपासू शकता. किसान क्रेडिट कार्ड फॉर्म सादर केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त आपण पंतप्रधान किसान निधी योजनेच्या 011-24300606 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता. या नंबरवर रकमेबाबत तुम्ही तपशील विचारू शकता किंवा तुमची तक्रार नोंदवू शकता.
PM Kisan Samman Nidhi beneficiary farmers have 8th installment today of 2000 Rs, PM Modi talks With Farmers
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App