देभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये 551 ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. हे ऑक्सिजन प्लांट लावण्यासाठी पीएम केअर्स फंडचा वापर केला जाणार आहे. PM Care Fund to set up 552 oxygen plants across the country, operating in government hospitals
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये 551 ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. हे ऑक्सिजन प्लांट लावण्यासाठी पीएम केअर्स फंडचा वापर केला जाणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, रुग्णालयातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी पीएम केअर्स फंडने सार्वजनिक आरोग्य सुविधेत ५५१ डेडिकेटेड प्रेशर स्विंग अँड्सॉर्प्शन मेडिकल ऑक्सिजन जेनरेशन प्लांट लावण्यासाठी फंडला मंजुरी दिली आहे.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी आढावा बैठक घेतली होती. यात त्यांनी मेडिकल ग्रेड ऑक्सिजनची क्षमता वाढवण्यासोबतच घर आणि रुग्णालयातील रुग्णांसाठी लागणाऱ्या महत्वाच्या वस्तुंची पुर्तता करण्यावर जोर दिला होता.
त्यांनी सर्व मंत्रालय आणि विभागांना ऑक्सिजन आणि मेडिकल सप्लायच्या उपलब्धतेसाठी कामात ताळमेळ ठेवण्यास सांगितले होते. हा निर्णयदेखील घेण्यात आला होता की, ३ महीन्यांसाठी ऑक्सिजनशी संबंधित वस्तु आणि उपकरणांच्या आयातीवर बेसिक कस्टम ड्यूटी आणि हेल्थ सेस लावला जाणार नाही.
याबाबत मोदींनी महसूल विभागाला अशा उपकरणांच्या इंपोर्टवर लवकरात लवकर कस्टम क्लीयरेंस देण्याचे निर्देश दिले होते. हा निर्णयदेखील घेण्यात आला होता की, कोरोनाच्या लसींच्या आयातीवरील बेसिक कस्टम ड्यूटीला 3 महीन्यांसाठी बंद केल जावे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App