केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता खून प्रकरणात पीआयएफ इस्लामी संघटनेच्या नेत्याला अटक


वृत्तसंस्था

केरळ: येथील पलक्कड़ जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता संजीथ यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात केरळ पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PIF) या इस्लामी संघटनेच्या नेत्याला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पोलिसांनी सुबीर याला ताब्यात घेऊन चौकशी केली. PIF leader arrested in Kerala murder case

त्याने इसाक तसेच अहमद ही नावे सांगितली. त्यांना अटक केल्यावर त्यांनी सु्पारी देणाऱ्याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी पीआयएफच्या नेत्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा तीव्र निषेध!

संजीथ यांच्यावर १५ नोव्हेंबर रोजी भरदिवसा त्यांच्या पत्नी समोर भीषण हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावर ३० वार करण्यात आले. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया एक जहाल इस्लामी संविधानविरोधी संघटना आहे. केरळसह महाराष्ट्र आणि इतर विविध राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे काम वाढत आहे.

भाजपने या प्रकरणात केंद्रीय तपास संस्थ NIA तपासाची मागणी केली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या इस्लामी संघटनेवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.

PIF leader arrested in Kerala murder case

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण