मंत्री, संघाचे स्वयंसेवक, न्यायाधिश आणि पत्रकारांचे फोन टॅप, द वायरचा दावा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मोदी सरकारमधील काही मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, न्यायाधीश आणि काही पत्रकारांचे फोन टॅप केले जात आहेत. यात मोठमोठ्या वृत्त समुहांच्या 40 हून अधिक पत्रकारांचे अज्ञात एजन्सीकडून फोन टॅप केल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. यासाठी पिगासस स्पायवेअरचा वापर करण्यात येत आहे, असा दावा द वायर या वेबसाईटने केला आहे.Phone taps of ministers, RSS leaders, judges and journalists, The Wire claims

वायरने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, हे पत्रकार हिंदुस्थान टाईम्सचे कार्यकारी संपादक शिशीर गुप्ता यांच्यासह इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेस सारख्या बड्या वृत्त समुहांमधील आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी वॉशिंग्टन पोस्ट अहवाल जाहीर करणार असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.पिगासस प्रोजेक्टवर लक्ष ठेवणाºया तज्ज्ञांना आढळले की, या यादीतील 10 भारतीयांचे फोन नंबरवर एकतर पिगाससकडून हॅक करण्याचा प्रयत्न झाला किंवा हॅकिंग यशस्वी झाले आहे. पिगासस हे इस्त्रायली कंपनीने बनविलेले एक हॅकिंगचे हत्यार आहे. याचा वापर फक्त सरकारी कामांसाठी म्हणजेच दहशवादी कारवांयांचा शोध घेण्यासाठी केला जातो.

कंपनीने त्यांच्या भारतीय ग्राहकांची यादी जाहीर करण्यास नकार दिला. ज्या लोकांना लक्ष्य करण्यात आले आहे किंवा करण्यात आले त्यांची नावे देखील जाहीर करण्यास कंपनीने नकार दिला आहे. तसेच ज्या एजन्सीने भारतीय नंबरवर लक्ष ठेवले ती अधिकृत भारतीय एजन्सी असल्याचे या कंपनीने स्पष्ट केले आहे. द वायरचे दोन संपादकही या यादीमध्ये आहेत.

द वायरच्या रोहिनी सिंग यांचा देखील नंबर या लीक झालेल्या यादीमध्ये आहे. गृहमंत्री अमित शहांचा मुलगा जय शहा याच्या उद्योगधंद्यांबाबत वृत्तांकन केल्यापासून त्यांचा नंबर पिगाससकडे गेल्याचे समजते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय उद्योजक निखील मर्चंट आणि जय शहा यांच्यातील व्यावसायिक संबंध, पीयुष गोयल आणि उद्योजक अजय पिरामल यांच्यातील व्यवहार आदींवर रोहिनी सिंग काम करत होत्या, असा दावा द वायरने केला आहे. फ्रान्सच्या एका संस्थेने ही यादी जगभरातील 15 हून अधिक वृत्तसंस्थांना दिली. या वृत्तसंस्थांनी एकत्रपणे यावर काम करत जवळपास 10 देशांतील 1500 हून अधिक लोकांचे नंबर शोधले आहेत. इस्त्रायली कंपनीने हे सॉफ्टवेअर 36 हून अधिक देशांना विकले आहे.

या अहवालात म्हटले आहे की न्यायाधिश, व्यापारी, सरकारी अधिकारी, वैज्ञानिक, कार्यकर्ते आणि इतरही 300 हून अधिक भारतीय मोबाइल टेलिफोनचा समावेश आहे. डेटाबेसमध्ये 40 हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षातील तीन प्रमुख व्यक्ती, एक घटनात्मक प्राधिकरण, नरेंद्र मोदी सरकारमधील दोन मंत्री, सुरक्षा दलांचे विद्यमान व माजी प्रमुख आणि अनेक व्यवसायिक यांचा समावेश आहे. आगामी काळात ही नावे प्रकाशित करण्यात येणार असल्याचे म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे नावही यामध्ये आहे. . न्यायाधीश अद्याप हा क्रमांक वापरत आहेत की नाही याची पडताळणी होणे बाकी आहे.वायरच्या आकडेवारीच्या विश्लेषणावरून दिसून आले आहे की बहुतेक नावे २०१८ ते २०१९ या काळात मोदी सरकारवर टीका करणारे आहे.

मात्र,पिगासस स्पायवेअर विकणाºया एनएसओ ग्रुप या इस्रायली कंपनीने हा आरोप फेटाळून लावला आहे. कंपनीने म्हटले आहे की, आपले स्पायवेअर केवळ अधिकृत सरकारना सेवा देतात. विशिष्ट लोकांवर सरकारी पाळत ठेवण्याबाबत केलेल्या आरोपांचे कोणतेही ठोस आधार नाही.

भारतासहित जगभरातील १४०० पत्रकार आणि कार्यकर्त्यांची माहिती लीक झाल्याची कबुली व्हॉट्सअ‍ॅपनं अमेरिकन फेडरल कोर्टात दिली होती. एनएसओ नावाच्या कंपनीवर पिगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माहिती चोरल्याचा आरोप केला होता. कॉलिंग फीचरमधील एका कमतरतेमुळे ही माहिती लीक झाली होती.

पिगासस सॉफ्टवेअरची किंमत ५६ कोटींच्या आसपास आहे. या किंमतील एका वषार्चा परवाना मिळतो. पिगाससच्या माध्यमातून एकाच वेळी ५० मोबाईलवर नजर ठेवली जाऊ शकते. पिगासस सॉफ्टवेअर यूजर्सच्या परवानगीशिवाय फोन ऑन -ऑफ आणि फॉर्मेट करू शकतो.

Phone taps of ministers, RSS leaders, judges and journalists, The Wire claims

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण