Petrol Diesel Price : इंधन तेलाच्या किमती पुन्हा गगनाला भिडल्या, दिल्लीत पेट्रोल 104, तर मुंबईत 110 रुपयांच्या पुढे


देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार पडत आहे. या वाढत्या किमतींमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर पोहोचली आहे. तेल कंपन्यांनी आज (रविवार) म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. दुसरीकडे, आज डिझेलच्या किमतीत 33 ते 35 पैशांनी वाढ झाली आहे, तर पेट्रोलच्या किंमतीत 26 ते 30 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पहिल्यांदाच डिझेलची किंमत 100 च्या पुढे गेली आहे.Petrol Diesel Price Hike Today 10 October 2021 Know Rates Of Your City According To IOCL


प्रतिनिधी

मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार पडत आहे. या वाढत्या किमतींमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर पोहोचली आहे. तेल कंपन्यांनी आज (रविवार) म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. दुसरीकडे, आज डिझेलच्या किमतीत 33 ते 35 पैशांनी वाढ झाली आहे, तर पेट्रोलच्या किंमतीत 26 ते 30 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पहिल्यांदाच डिझेलची किंमत 100 च्या पुढे गेली आहे.

दिल्लीत पेट्रोल 104.14 रुपये, तर डिझेल 92.82 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 110.12 रुपये आणि डिझेलची किंमत 100.66 रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 104.80 रुपये, तर डिझेल 95.93 रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर चेन्नईमध्ये पेट्रोल 101.53 रुपये लिटर आणि डिझेल 97.26 रुपये प्रति लीटर आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पेट्रोल-डिझेलच्या किमती तुम्ही एसएमएसच्या माध्यमातूनही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबरवर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड तुम्हाला आयओसीएलच्या वेबसाइटवर मिळेल.
याशिवाय तुम्ही या https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx लिंकवरही दर चेक करू शकता.

Petrol Diesel Price Hike Today 10 October 2021 Know Rates Of Your City According To IOCL

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था