वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ऑस्कर नामांकित दिग्दर्शक आणि हॉलिवूडला (Hollywood) दिग्गज चित्रपट देणारे पीटर बोगदानोविच (Peter Bogdanovich) यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. जुने हॉलीवूड आणि नवीन हॉलीवूडमधील पूल म्हणून काम करणारे चित्रपट निर्माता, समीक्षक आणि रॅकॉन्टर यांचे लॉस एंजेलिस येथील त्यांच्या घरी नैसर्गिक कारणांमुळे निधन झाले, त्यांची मुलगी अँटोनिया बोगदानोविच यांनी हॉलिवूड प्रसारमांध्यामांना माहिती दिली.
ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक पीटर बोगदानोविच (Peter Bogdanovich) यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. पीटर हे 70 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते. त्याचं आयुष्यही हॉलिवूडच्या ड्रामा फिल्मपेक्षा कमी नव्हतं. हॉलिवूडमध्ये (Hollywood) त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शनही केले. ते केवळ त्याच्या रील लाइफमुळेच नाही तर खऱ्या आयुष्यातही चर्चेत होते.
पीटरने स्वतःचे चित्रपट दिग्दर्शित करण्यास सुरुवात केली त्यांचा 1968 मध्ये आलेल्या ‘टार्गेट’ या चित्रपटातून. जो समीक्षकांच्या दृष्टीने यशस्वी ठरला. यानंतर त्यांनी 1971 मध्ये ‘द लास्ट पिक्चर शो’ हे नाटक केले, त्यानंतर त्यांना खूप प्रशंसा आणि प्रसिद्धी मिळाली. त्यावेळच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या यादीत ते आले. या चित्रपटाने त्यांना एक वेगळी ओळख दिली. या चित्रपटाला ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अडॉप्टेड स्क्रीनप्लेसाठी नामांकन मिळाले होते. त्यांच्या या यशानंतर त्यांनी 1972 मध्ये ‘व्हॉट्स अप डॉक?’ नावाचा विनोदी चित्रपट काढला होता.
पीटरने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ‘द लास्ट पिक्चर शो’, The (Last Picture Show) ‘व्हॉट्स अप, डॉक?’ (What’s Up, Doc?) या चित्रपटाने सुरुवात केली आणि चांहत्यांन मध्ये या चित्रपटाची क्रेझ जबरदस्त पाहायला मिळाली नंतर ‘पेपर मून’ (Paper Moon) आणि एका पिढीसाठी फिल्म प्रोफेसर म्हणून काम केले.
प्रतिष्ठित चित्रपट निर्माता प्रसिध्दित जेव्हा आले तेव्हा त्याना 1971 च्या समीक्षकांनकडून सुपरहिट् ब्लॅक-अँड-व्हाइट क्लासिक, ‘लास्ट पिक्चर शो’ दिग्दर्शित केल्यावर प्रसिद्धी मिळवली, ज्याना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी 8 ऑस्कर नामांकने मिळवली. त्यांनी ‘मास्क’, ‘डेझी मिलर’ आणि ‘अॅट लाँग लास्ट लव्ह’ या संगीत नाटकाचे दिग्दर्शनही केले.
Legendary director Peter Bogdanovich passes away Read @ANI Story | https://t.co/00lLKEoomS#PeterBogdanovich pic.twitter.com/hRjDkHf2Pe — ANI Digital (@ani_digital) January 7, 2022
Legendary director Peter Bogdanovich passes away
Read @ANI Story | https://t.co/00lLKEoomS#PeterBogdanovich pic.twitter.com/hRjDkHf2Pe
— ANI Digital (@ani_digital) January 7, 2022
एक उत्कृष्ट चित्रपट निर्माता म्हणून ओळखले जाणारे, पीटर चित्रपटात ऑन-स्क्रीन देखील दिसले, त्याच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल बोलायला गेले तर पीटर यांंनी दोन लग्न केले आहे. अँटोनिया बोगदानोविच आणि सशी बोगदानोविच या दोन मुली आहेत. तसेच गेल्या काही वर्षांत त्यांनी चित्रपटांबद्दल अनेक पुस्तके लिहिली, ज्यात हॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांचा” समावेश आहे.
1973 मध्ये त्यांनी बनवलेला ‘पेपर मून’ हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा चित्रपट होता. या चित्रपटासाठी ‘गोल्डन ग्लोब’ या मोठ्या अवॉर्ड शोमध्ये त्याची पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या श्रेणीत निवड झाली. यानंतर त्यांचे तीन चित्रपट अयशस्वी ठरले पण त्यानंतर त्यांनी 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सेंट जॅक’ नावाच्या कल्ट चित्रपटाद्वारे पुन्हा पुनरागमन केले. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांचा सिलसिला सुरूच राहिला आणि ते हॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकांच्या श्रेणीत आले. ते शेवटचे एबीओच्या ‘द सोप्रॉन्स’ या मालिकेत दिसले होते. त्यांच्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ते नेहमीच सिनेरसिकांच्या स्मरणात राहतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App