एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचं महत्वाचं वक्तव्य
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. एवढंच नाही तर तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरू शकते असंही मत काही तज्ज्ञांनी वर्तवलं होतं. याबाबत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. तिसरी लाट आली तर ती लहान मुलांसाठी किती घातक ठरू शकते याचा कोणताही डेटा नाही असं डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं आहे. People’s negligence leads to infection; How dangerous is the third wave of corona for young children? No data available: Dr. Randeep Guleria
No data, global or Indian, has had any observations of children being affected more. Even in the 2nd wave kids who were infected had mild illness or co-morbidities. I don't think we will have a serious infection in children in the future: Dr Randeep Guleria, AIIMS Director pic.twitter.com/q4w7ceurDr — ANI (@ANI) June 8, 2021
No data, global or Indian, has had any observations of children being affected more. Even in the 2nd wave kids who were infected had mild illness or co-morbidities. I don't think we will have a serious infection in children in the future: Dr Randeep Guleria, AIIMS Director pic.twitter.com/q4w7ceurDr
— ANI (@ANI) June 8, 2021
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सध्या आमच्याकडे काही माहिती नाही. तसंच हे पण सांगणं कठीण आहे की कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी किती घातक ठरू शकते याचीही माहिती आमच्याकडे नाही असंही रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं. व्हायरस म्युटेट होतो, त्याचे व्हेरिएंट तयार होतात म्हणजेच हा व्हायरस त्याचं रूप बदलतो.
त्यामुळे कोरोनाच्या लाटा येतात.लॉकडाऊनमुळे संसर्ग रोखण्यास मदत होते. मात्र लॉकडाऊन अनलॉक केल्यानंतर लोक गर्दी करतात आणि त्यामुळे संसर्ग वाढू शकतो. आत्ता असं कोणताही ठोस कागद आमच्या हाती नाही किंवा ठोस दावाही नाही की ज्या आधारे आम्ही हे सांगू शकू की कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी जास्त घातक ठरेल.
याबाबत कोणताही डेटा उपलब्ध नाही. देशपातळीवर नाही किंवा जागतिक पातळीवरही नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कोरोना प्रतिबंधांचं पालन करणं हाच उपाय आपल्याकडे आहे म्हणजेच हात धुणं, हात सॅनेटाईझ करणं, मास्क लावणं, सुरक्षित अंतर ठेवणं, फिजिकल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन या सगळ्यामुळे आपण कोरोना संसर्ग रोखू शकतो. स्पॅनिश फ्लू, एच1, एन1 मध्येही अशा लाटा आल्या होत्या. व्हायरसमध्ये म्युटेशन झालं की लाटा येतात. व्हायरसमधले बदल हे ह्युमन बिहेवियरमुळे होतात.
लॉकडाऊन असतो तोपर्यंत लोक शिस्त पाळतात. त्यानंतर जेव्हा अनलॉक केल्यानंतर लोक निष्काळजीपणा करतात. लोकांच्या निष्काळजीपणामुळे संसर्ग होतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपण आता सावरत आहोत. अशात तिसऱ्या लाटेचाही धोका जाणवतो आहे. अनेक तज्ज्ञांनी असं म्हटलं होतं की कोरोनाची तिसरी लाटही येऊ शकतो. या लाटेचा फटका लहान मुलांना जास्त आहे. मात्र ही लाट मुलांसाठी घातक ठरू शकते का? याचं उत्तर आत्ता तरी आमच्याकडे नाही असं एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App