पाकिस्तानी नागरिकांना भारतीय दूरदर्शनची भुरळ, सर्वाधिक लोक यू ट्यूबवर पाहतात दूरदर्शन आणि आकाशवाणीचे कार्यक्रम

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाकिस्तानी राज्यकर्ते भारताविषयी विषारी फुत्कार सातत्याने सोडत असले तरी येथील जनतेला मात्र भारताबद्दल आत्मियता आहे. भारतीय कलाकार तर पाकिस्तानातही लोकप्रिय आहेत.भारतातील सरकारी वाहिनी असलेल्या दूरदर्शन आणि आकाशवाणीचे कार्यक्रम पाकिस्तानात लोकप्रिय आहेत. मात्र, पाकिस्तानकडून थेट प्रक्षेपणास बंदी असल्याने पाकिस्तानी नागरिकांना यू ट्यूबवर हे कार्यक्रम पाहावे लागतात.Pakistani citizens are fascinated by Indian television, most people watch television and radio programs on YouTube

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, दूरदर्शन आणि आकाशवाणी यांना पाकिस्तानात सर्वाधिक पाहिले व ऐकले जाते. प्रसार भारतीच्या यू-ट्यूब चॅनलच्या दर्शकांमध्येही वाढ झाली आहे.२०२१ मध्ये प्रसार भारतीचे चॅनल पाकिस्तानातील ६९ लाख ६८ हजार ४०८ दर्शकांनी पाहिले. अन्य देशांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. दुसरीकडे अमेरिकेत प्रसार भारतीचे यू-ट्यूब चॅनल पाहणाऱ्यांची संख्या ५६ लाख ४७ हजार ५६५ असून, बांगलादेशमध्ये ५१ लाख ८२ हजार १० प्रेक्षक असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.

तसेच नेपाळमध्ये ३१ लाख ६८ हजार ८१० आणि यूएईमध्ये २७ लाख २१ हजार ९८८ प्रेक्षकांनी प्रसार भारतीचे यू-ट्यूब चॅनल पाहिल्याचे या उत्तरात म्हटले आहे.२०२० मध्ये प्रसार भारतीचे यू-ट्यूब चॅनल पाहणाºयांमध्ये पाकिस्तानमधील प्रेक्षकांची संख्या सर्वाधिक होती.

पाकिस्तानात १ कोटी ३३ लाख ५०४, अमेरिकेत १ कोटी २८ लाख ६३ हजार ६७४, संयुक्त अरब अमिरातमध्ये ८२ लाख ७२ हजार ५०६, बांगलादेशमध्ये ८१ लाख ३६ हजार ६८४ आणि सौदी अरेबियामध्ये ६५ लाख २९ हजार ६८१ व्ह्यूज प्रसार भारतीच्या यू-ट्यूब चॅनलला मिळाल्याची माहिती देण्यात आली.

प्रसार भारतीच्या १७० पेक्षा जास्त यू-ट्यूब वाहिन्या आहेत. प्रसार भारतीचे डिजिटल चॅनल परदेशातही चांगलेच लोकप्रिय आहेत. यामध्ये आकाशवाणीचाही समावेश असून, कंटेट अपलोड करण्यासाठी डेडिकेटेड डिजिटल प्लॅटफॉर्म विंग तयार करण्यात आली आहे.

Pakistani citizens are fascinated by Indian television, most people watch television and radio programs on YouTube

महत्त्वाच्या बातम्या