पाकिस्तानचा आणखी एक कट उघड, तालिबानचे व्हिडिओ दाखवून काश्मिरींची दिशाभूल सुरू, गृहमंत्रालयाची कठोर भूमिका

Pakistan Misleading People Of Kashmir by Showing Taliban Videos Afghanistan

Pakistan Misleading People Of Kashmir : तालिबानच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुभांड रचणाऱ्या पाकिस्तानचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. पाकिस्तानच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानचे व्हिडिओ दाखवून जम्मू -काश्मीरला इस्लामिक स्टेट म्हणण्याचा कट रचला जात असल्याचे उघड झाले आहे. पंचायतीच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना धमकावले जात आहे. या धमकीमुळे काही लोकांनी आपली पदेही सोडली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतले असून कठोर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. Pakistan Misleading People Of Kashmir by Showing Taliban Videos Afghanistan


विशेष प्रतिनिधींना

नवी दिल्ली : तालिबानच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुभांड रचणाऱ्या पाकिस्तानचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. पाकिस्तानच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानचे व्हिडिओ दाखवून जम्मू -काश्मीरला इस्लामिक स्टेट म्हणण्याचा कट रचला जात असल्याचे उघड झाले आहे. पंचायतीच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना धमकावले जात आहे. या धमकीमुळे काही लोकांनी आपली पदेही सोडली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतले असून कठोर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पाकिस्तानचे पुन्हा नापाक कृत्य

अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यानंतर लगेचच पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरबाबत आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. या वेळी व्यवस्थित षडयंत्र रचले जात आहे. पहिल्या टप्प्यात जम्मू -काश्मीरमध्ये बसलेल्या पाकिस्तानच्या चमच्यांनी अफगाणिस्तान आणि तालिबानच्या नावाने लोकांना धमकावणे सुरू केले आहे. लोकांना अफगाणिस्तानच्या ताज्या परिस्थितीचे असे व्हिडिओ दाखवून एक षडयंत्र रचले जात आहे, ज्यामुळे असे दिसते की हे काम अफगाणिस्तान आणि तालिबानच्या इशाऱ्यावर केले जात आहे.

तालिबानचा व्हिडिओ दाखवून दिशाभूल

गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, काश्मीरच्या कुलगाम आणि आसपासच्या परिसरात काही जण अफगाणिस्तानचे ताजे व्हिडिओ दाखवून लोकांची दिशाभूल करत आहेत की, काश्मीर इस्लामिक स्टेट आहे. त्याच वेळी, पंचायतीचे निवडून आलेले पंच आणि सरपंचांना धमकी दिली जात आहे की, एकतर त्यांचे पद सोडा किंवा गंभीर परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहा. गुप्तचर सूत्रांचे असे मत आहे की, हा षडयंत्राचा पहिला भाग आहे, ज्या अंतर्गत लोकांना धमकी दिली जात आहे, जेणेकरून काही जण घाबरून त्यांच्या पदांचा राजीनामा देतील.

दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता

यानंतर, पाकिस्तान कटाचा दुसरा टप्पा सुरू करणार आहे. यानुसार काही लोकांवर हल्ला किंवा ठार मारले जाऊ शकते आणि नंतर असा प्रचार केला जाईल की, हे काम तालिबानच्या सांगण्यावरून करण्यात आले आहे. गुप्तचर विभागाशी संबंधित एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत षडयंत्राअंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांशी संबंधित काही लोक या प्रकरणात सामील असल्याचे सांगितले जात आहे.

गृह मंत्रालयाची कठोर भूमिका

केंद्रीय गृह मंत्रालयाने गुप्तचर यंत्रणांनी दिलेला हा अहवाल अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. काश्मीरसंदर्भात झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्रालयाने आपली कठोर भूमिका स्पष्ट केली आणि अधिकार्‍यांना याप्रकरणी कडक कारवाई करण्यास सांगितले. अशा घटकांना पूर्ण ताकदीने सामोरे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Pakistan Misleading People Of Kashmir by Showing Taliban Videos Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात