वृत्तसंस्था
गुरुग्राम : ओयो रूम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचे शुक्रवारी त्यांच्या अपार्टमेंटच्या 20व्या मजल्यावरून पडून निधन झाले. रमेश अग्रवाल यांच्या आत्महत्येची शक्यताही पोलिसांनी नाकारलेली नाही. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. Oyo founder Ritesh Agarwal’s father dies after falling from 20th floor
दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अब्जाधीश उद्योगपती रितेश अग्रवाल यांचे नुकतेच 7 मार्च 2023 रोजी गीतांशा सूदसोबत लग्न झाले होते.
रमेश अग्रवाल आपल्या पत्नीसोबत द क्रेस्ट कॉन्डोमिनियम, DLF फेज-4 येथे राहत होते. पोलिस उपायुक्त (पूर्व) वीरेंद्र विज यांनी सांगितले की, शुक्रवारी पोलिसांना माहिती मिळाली की, 20व्या मजल्यावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ओयो रूम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल असे मृताचे नाव आहे. अपघाताच्या वेळी रितेश अग्रवाल, त्याची आई आणि नवविवाहित पत्नी गीतांशा फ्लॅटमध्ये उपस्थित होते.
रितेश अग्रवाल वडिलांसोबत या अपार्टमेंटमध्ये राहत नसल्याचे सांगण्यात येत आहे. रितेश अग्रवाल यांचे कुटुंब मूळचे रायगडा, ओडिशाचे आहे. येथे त्यांचे वडील रमेश अग्रवाल हे सिमकार्ड विकण्याचे छोटेसे दुकान चालवायचे. 7 मार्च रोजी रितेश अग्रवाल यांच्या लग्नाला देशातील आणि जगातील नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती. यामध्ये जपानी कंपनी सॉफ्ट बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मासायोशी सोन हेही पोहोचले. ज्यांच्याकडून रितेश आणि त्याच्या पत्नीने चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. याशिवाय हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल हेही वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते.
रितेश अग्रवाल यांनी जारी केले निवेदन
यावेळी आपल्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर केला पाहिजे, असे रितेश अग्रवाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, मला जड अंतःकरणाने सांगावेसे वाटते की आमचे मार्गदर्शक माझे वडील रमेश अग्रवाल यांचे 10 मार्च रोजी निधन झाले आहे. ते पूर्ण आयुष्य जगले आणि मला तसेच आपल्या सर्वांना प्रेरणा दिली. त्यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. माझ्या वडिलांनी आम्हाला आमच्या अत्यंत कठीण काळात पुढे नेले. त्यांचे शब्द आमच्या हृदयात गुंजत राहतील.
काय म्हणाले पोलीस?
पोलिसांच्या प्राथमिक तपासातही आत्महत्येची बाब नाकारलेली नाही. रमेश अग्रवाल ज्या बाल्कनीतून पडले त्या 20व्या मजल्यावरील अपार्टमेंटचे रेलिंग साडेतीन फूट उंच आहे. अशा स्थितीत येथून पडणे हा अपघात होऊ शकत नाही. मात्र, पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. कुटुंबाकडूनही तक्रार आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App