वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील 292 कोटींच्या मद्य घोटाळ्यात सीबीआय आणि ईडीने आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये सर्वात मोठे नाव मनीष सिसोदियांचे आहे. राऊज अव्हेन्यू कोर्टातून शुक्रवारी सिसोदिया यांना मोठा धक्का बसला. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवण्याची परवानगी दिली आहे. ED told court about connection between Sisodia and Kavita, CM Kejriwal-Sanjay Singh also accused in charge sheet
इतकेच नाही, तर ईडीच्या आरोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि खासदार संजय सिंह यांचीही नावे आहेत. याच प्रकरणात शनिवारी 11 मार्च रोजी ईडी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी कविता यांचीही चौकशी करणार आहे. ईडी ज्याप्रकारे सक्रिय होताना दिसत आहे त्यावरून आणखी अनेक नेत्यांना मद्य घोटाळ्याच्या तपासात गोवले जाऊ शकते का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
फंडिंगसाठी संजय सिंहांनी केला होता फोन
ईडीने मनीष सिसोदिया यांना ताब्यात घेण्यासाठी राऊज अव्हेन्यू न्यायालयात केलेल्या युक्तिवादात आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांचेही नाव घेतले. ईडीने रेस्टॉरंटचे मालक दिनेश अरोरा यांचे नाव लाचखोर समन्वयक म्हणून दाखवले. ईडीने सांगितले की, 2020 मध्ये दिनेश अरोरा यांना संजय सिंह यांचा फोन आला की निवडणुका येत आहेत आणि आम आदमी पक्षाला निधीची गरज आहे.
आरोपपत्रात सीएम केजरीवाल यांचे नाव
दिल्ली मद्य घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या ईडीच्या आरोपपत्रात अरविंद केजरीवाल यांचा दोन ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे. अशा स्थितीत सिसोदिया यांच्यानंतर केजरीवाल यांचीही चौकशी होऊ शकते का, अशी चर्चा सुरू आहे. वास्तविक हा प्रश्न निर्माण होण्याची तीन कारणे आहेत-
1. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्या उपस्थितीत केजरीवाल यांच्या घरी मद्य घोटाळ्याची ड्राफ्ट कॉपी दाखवण्यात आली.
2. फेसटाइमवर एका आरोपीशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी विजय नायर हा माझा माणूस आहे, त्याच्याशी बोला, असे म्हटल्याचा दावा केला जात आहे.
3. ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या पीएला फोन करून चौकशी केली आहे.
तेलंगणापर्यंत घोटाळ्याच्या तारा
दिल्लीत मद्य घोटाळा झाला असेल पण त्याची तार तेलंगणापर्यंत जोडलेली आहे. दिल्ली मद्य घोटाळ्यात सध्या देशात भाजपविरोधात बिगरकाँग्रेस आघाडी उभारण्याच्या प्रयत्नात असलेल्या केसीआर यांची कन्या कविता यांचे नाव समोर येत आहे. कोर्टात सुनावणीदरम्यान ईडीचे वकील जोहेब हुसेन म्हणाले की, ‘सिसोदिया यांचे सहायक विजय नायर या संपूर्ण कटाचे संचालन करत होते. या घोटाळ्यात सरकारी यंत्रणा, मध्यस्थ आणि इतर अनेक लोक सामील आहेत. हा कट विजय नायर, सिसोदिया, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता आणि इतर अनेकांनी रचला होता.
ईडीने सांगितले की, “दक्षिणेमधील गटाने आप नेत्यांना 100 कोटींची लाच दिली, त्यानंतर एक गट तयार करण्यात आला जेणेकरून दिल्लीत 30 टक्के दारूचा व्यवसाय चालवता येईल.” सिसोदिया यांचे प्रतिनिधी म्हणून नायर यांनी कविता यांची भेट घेतल्याचे कागदपत्रांवरून दिसून आले आहे. सिसोदिया मद्याच्या धोरणावर कसा प्रभाव टाकू शकतात, हे नायर यांना कविता यांना सांगायचे होते. कोर्टात ईडीने सांगितले की, कविता यांचे ऑडिटर बुची बाबू यांनी सांगितले की, मनीष सिसोदिया आणि कविता यांच्यात राजकीय समन्वय होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App