उत्तर प्रदेशातील यादव – मुस्लिम वोट बँकेची साखळी फोडण्याचा असदुद्दीन ओवैसींचा प्रयत्न


विशेष प्रतिनिधी

लखनौ : उत्तर प्रदेशात वर्षानुवर्षे मुस्लिम समाज समाजवादी पार्टीला मतदान करतो आहे. मुलायम सिंग यादव यांच्या काळापासून त्यांनी 11% यादव आणि 19 टक्के मुस्लिम मतांची गोट बँक समाजवादी पार्टीबरोबर घट्ट बांधून टाकली आहे. ही वोट बँकच फोडण्याचा हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा प्रयत्न आहे. Owaisi tries to dismantle Muslim-Yadav combination to make inroads in U.P.

ओवैसी यांनी गेल्या तीन दिवसांत जे आपल्या उत्तर प्रदेश दौऱ्यामध्ये सुलतानपूर बाराबंकी फैजाबाद येथे मुस्लिम मेळाव्यांना संबोधित केले त्यामध्ये मुसलमानांना आपल्या वोट बँकेची ताकद समजावण्याचा प्रयत्न केला. 11% यादव जर उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री ठरवत होते तर 19 % मुसलमान आपल्याला हवे तसे आमदार का निवडून आणू शकत नाहीत?, असा सवाल त्यांनी केला. यादवांना मुख्यमंत्री मंत्री व्हावेसे वाटते पण मुसलमान मात्र त्यांना संत्री, चपरासी हवे असतात. यादवांना मुसलमानांची मते पाहिजेत पण त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंची त्यांच्या समस्यांची त्यांना काही देणे घेणे नाही. मुसलमानांनी कधीतरी हा विचार केलाय का?, असा रोकडा सवाल ओवैसी यांनी केला.एकीकडे यादव – मुस्लिम वोट बँक फोडत असताना दुसरीकडे मायावतींनी बहुजन समाज पक्ष साफसूफ करत असताना ज्यांना पक्षाच्या तिकिटावर पासून वंचित ठेवले आहे, त्या अतीक अहमद आणि मुख्तार अन्सारी यांना असदुद्दीन ओवैसी यांनी जवळ केले आहे. त्यांची माफिया प्रतिमा मायावतींच्या अडचणीची ठरत होती पण हीच प्रतिमा ओवैसींना मुसलमानांना आकर्षित करणारी वाटत आहे. त्यामुळे त्यांनी अतीक अहमदची पत्नी परविन हिला पक्षात प्रवेश दिला आणि मुख्तार अन्सारीला त्याला हवेत तिथून तिकीट देण्याचे आश्वासन दिले.

मुसलमान मते संघटित होत असतील तर भाजपला विरोध करणारे पक्ष एआयएमआयएमला भाजपची बी टीम म्हणतात. पण ते जेव्हा हिंदूंची मते फोडतात आणि तरीही भाजप जिंकून येते तेव्हा ते स्वतः भाजपची बी टीम नसतात का?, असा सवालही ओवैसी यांनी केला. मुस्लिमांना मतांच्या टक्केवारीनुसार प्रतिनिधित्व मिळत नाही असा त्यांचा दावा आहे. उत्तर प्रदेश च्या निमित्ताने त्यांनी उघडपणे तो मांडला आहे आणि त्यामुळेच भाजपच्या विरोधी पक्षांच्या पोटात गोळा उठला आहे.

Owaisi tries to dismantle Muslim-Yadav combination to make inroads in U.P.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी