वृत्तसंस्था
जुन्नर : ‘ गेली पन्नास वर्षे सत्ता पवारांच्या घरात पाणी भरते आहे. मात्र, बारामती विधानसभा मतदारसंघातील २४ गावांत शेतीला आणि पिण्याचे पाणी नाही. अशीच अवस्था जुन्नर तालुक्यात आहे. येथे पाच धरणे असूनही अणे पठारावर पाणी नाही. तालुक्यातील जनता पाण्यासाठी पायपीट करत आहे. पवार कुटुंबीयांचे यापेक्षा मोठे पाप कोणतेच असूच शकत नाही,’ अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. Fifty years of power is in Pawar’s house ; but 24 villages in Baramati are thirsty, agriculture, drinking water problem ‘as it was’: Gopichand Padalkar
जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या आणि पूर्वाश्रमीच्या शिवसेना नेत्या आशा बुचके यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा सत्कार बेल्हे येथे करण्यात आला. त्यावेळी पडळकर बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जुन्नर तालुकाध्यक्ष संतोष तांबे; तसेच आशा बुचके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पडळकर म्हणाले, ‘काँग्रेसने कायम घराणेशाहीने गांधी घराण्यातले राष्ट्रीय अध्यक्ष केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनही अध्यक्ष बदलला नाही. दोन वर्षे झाली, तरी एसटी कामगारांना पगार नाही. असे असतानाही येथील कामगार संघटनांनी कधीही मोर्चा काढला नाही. कारण, या संघटनादेखील पवारांच्या घरी पाणी भरतात. बैलगाडा मालकांच्या विरोधातील गुन्हे मागे घेतलेले नाहीत.’ गणेश भेगडे म्हणाले, खासदार ‘संजय राऊत हे पैसे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करतात.’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App