Positive news : भारतात लसींच्या २१६ कोटी डोसचे उत्पादन करणार; जागतिक कंपन्यांना भारतात खुले निमंत्रण; मोदी सरकारचा पुढाकार; नीती आयोगाची माहिती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना फैलाव जितक्या वेगाने होतोय तेवढेच युध्दपातळीवर प्रयत्न करून त्याला रोखण्याचे उपाय केंद्र सरकार करताना दिसते आहे. केंद्राने यासाठी बरेच धोरणात्मक मूलभूत बदल केले असल्याचे स्पष्ट होत आहे.नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांच्या पत्रकार परिषदेत याचा प्रत्यय आला आहे. त्यांनी दिलेली माहिती अशी Overall, 216 crore doses of vaccines will be manufactured in India between August-December – for India and for Indians., Dr VK Paul, Member (Health), NITI Aayog

केंद्र सरकार युध्दपातळीवर लसीकरणासाठी प्रयत्नात असताना येत्या ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या कालावधीत कोरोना प्रतिबंधक लसींच्या २१६ कोटी डोसच्या उत्पादनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. ही लस सर्व भारतीयांसाठी उपलब्ध असेल.



भारत सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) आणि जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिलेल्या कोणत्याही लसीच्या आयातीस तसेच भारतात उत्पादनास परवानगी देण्यात आलेली आहे.

संबंधित कंपन्यांना एक – दोन दिवसांमध्ये योग्य कागदपत्रांची पूर्तता करून लायसन्स देण्यात येईल. आयातीचे एकही लायसन्स सध्या पेंडिंग नाही.

भारताचे परराष्ट्र मंत्रालय, बायोटेक डिपार्टमेंट, तसे अन्य संबंधित मंत्रालये जागतिक पातळीवरील औषध निर्मिती कंपन्या फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या नियमित संपर्कात आहे. त्यांना भारतात निर्यातीबरोबर उत्पादनाची सुविधा देऊन तसेच योग्य पार्टनरही शोधून देण्यात येईल.

या सगळ्या कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत लस निर्मिती आणि निर्यातीबद्दल भारत सरकारला कळवतील, असे सांगण्यात येत आहे.

रशियातून स्फुटनिक लस भारतात आली असून येत्या आठवडाभरात ती बाजारात उपलब्ध होईल. अर्थात ती मर्यादित स्वरूपात असेल. जुलै २०२१ मध्ये भारतात त्याचे उत्पादन सुरू होईल. १५ कोटी डोसची निर्मिती करण्यात येईल.

Overall, 216 crore doses of vaccines will be manufactured in India between August-December – for India and for Indians., Dr VK Paul, Member (Health), NITI Aayog

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात