आता घरातही मास्क घालण्याची वेळ आली आहे, कोरोनामुळे वाढलेल्या संकटावर नीती आयोगाचा सल्ला

Niti Aayog Member Dr VK Paul Says, Now its time to Wear mask at home

Niti Aayog Member Dr VK Paul : देशात कोरोनाची संसर्गामुळे रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय की, आता लोकांनी घरीसुद्धा मास्क घालण्याची वेळ आली आहे. ते म्हणाले की, जर कुटुंबातील एखादा कोरोना संसर्गग्रस्त आढळला असेल तर त्यालाही मास्क लावावा आणि रुग्णाला दुसर्‍या खोलीत ठेवावे. Niti Aayog Member Dr VK Paul Says, Now its time to Wear mask at home


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोनाची संसर्गामुळे रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय की, आता लोकांनी घरीसुद्धा मास्क घालण्याची वेळ आली आहे. ते म्हणाले की, जर कुटुंबातील एखादा कोरोना संसर्गग्रस्त आढळला असेल तर त्यालाही मास्क लावावा आणि रुग्णाला दुसर्‍या खोलीत ठेवावे.

डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले की, या महामारीला पराभूत करण्यासाठी आपल्याला लसीकरण गतीने पुढे न्यायाचे आहे. लसीकरणाची गती कमी करून चालणार नाही. ते म्हणाले की, या कोरोना परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीने अनावश्यक बाहेर फिरू नये. कुटुंबासमवेत असतानाही मास्क घालावा. ते म्हणाले की, मास्क घालणे फार महत्त्वाचे आहे. फारच निकडचे नसेल तर इतरांना आपल्या घरीही बोलावू नका.

महिलांना पीरियडदरम्यानही लस दिली जाऊ शकते

डॉ. व्ही के पॉल म्हणाले की, या भयंकर उद्रेकादरम्यान आपण कोरोना लसीकरणाची गती कमी करू शकत नाही. खरं तर लसीकरण मोहीम वेगाने वाढवली पाहिजे. यासह त्यांनी असेही म्हटले की, या लसी महिला मासिक पाळीच्या दरम्यान घेऊ शकतात. केवळ त्यामुळे लस घेणे पुढे ढकलण्याचे कोणतेही कारण नाही.

Niti Aayog Member Dr VK Paul Says, Now its time to Wear mask at home

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती