सरन्यायाधीशांच्या नावे बनावट ट्विटर अकाउंट, जस्टिस रमना यांच्या पोलिसांत तक्रारीनंतर ट्वीटरनेही केली कारवाई

CJI's Fake Twitter Account, Tweets Removed after Justice Ramana Police Complaint

Justice Ramana : सोशल मीडियावर फसवणूक करणाऱ्यांची कमतरता नाही. अनेक सेलिब्रिटी, राजकारण्यांच्या नावे बनावट अकाउंट उघडून फसवणूक केली जाते. आता तर भारताच्या सरन्यायाधीशांचे बनावट ट्वीटर अकाउंट सुरू करण्यात आल्याचे समोर आले. ही बाब लक्षात आल्यानंतर स्वत: सरन्यायाधीश रमना यांनी सोमवारी दुपारी पोलिसांत तक्रार दिली. यानंतर ट्विटरने हे ट्विट केवळ डिलीटच केले नाही, तर खातेही निलंबित केले. CJIs Fake Twitter Account, Tweets Removed after Justice Ramana Police Complaint


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सोशल मीडियावर फसवणूक करणाऱ्यांची कमतरता नाही. अनेक सेलिब्रिटी, राजकारण्यांच्या नावे बनावट अकाउंट उघडून फसवणूक केली जाते. आता तर भारताच्या सरन्यायाधीशांचे बनावट ट्वीटर अकाउंट सुरू करण्यात आल्याचे समोर आले. ही बाब लक्षात आल्यानंतर स्वत: सरन्यायाधीश रमना यांनी सोमवारी दुपारी पोलिसांत तक्रार दिली. यानंतर ट्विटरने हे ट्विट केवळ डिलीटच केले नाही, तर खातेही निलंबित केले.

न्यायमूर्ती रमना यांनी शनिवारी देशाच्या 48व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. ते 26 ऑगस्ट 2022 पर्यंत या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांच्याकडे ट्विटर किंवा सोशल मीडिया अकाउंट नाही. त्यांच्या नावावर ट्विट केल्याची बाब जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर ट्विटरनेही तातडीने त्यांच्या अकाऊंटवरील ट्विट डिलीट केले आणि हे अकाउंटही निलंबित केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सरन्यायाधीशांच्या नावे बनवण्यात आलेल्या या फेक अकाउंटमधून राष्ट्रीय सुरक्षा सचिव अजित डोभाल यांचे कौतुक करण्यात आले होते. त्यातील ट्वीटनुसार, डोभाल यांच्या मुत्सद्दीपणामुळे अमेरिकेने रविवारी रात्री कोविड लस तातडीने भारताला देण्यासाठी कच्चा माल देण्याचा निर्णय घेतला. परंतु आता ट्वीटरने हे सर्व ट्वीट्स डिलीट केले आहेत.

CJIs Fake Twitter Account, Tweets Removed after Justice Ramana Police Complaint

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात