शाळा तातडीने सुरू करण्याची आघाडीच्या ५६ शिक्षणतज्ञ, डॉक्टरांची खुल्या पत्राद्वारे मागणी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – देशभरातील आघाडीचे ५६ शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर आणि अन्य व्यावसायिकांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांना खुले पत्र लिहिले असून त्यात त्यांनी शाळा आणि प्रत्यक्षवर्ग सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा अशी विनंती केली आहे.

जागतिक स्थिती विचारात घेता शाळा आणि प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याबाबत तातडीने विचार होणे गरजेचे असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. जगातील केवळ चार ते पाच देशांनी शाळा सुरू केलेल्या नाहीत त्यात भारताचाही समावेश असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.


BIG BREAKING – Maharashtra Schools : १७ ऑगस्टपासून शाळा उघडणार नाहीत:टास्कफोर्सच्या बैठकीनंतर महाराष्ट्र सरकारचा निर्णय


मुलांना तातडीने शाळेमध्ये आणणे गरजेचे असून लहान मुलांना तसा संसर्गाचा धोका कमीच आहे. त्यामुळेच सुरूवातीला प्राथमिक शाळा सुरू करण्यात याव्यात. आयसीएमआरने देखील तशीच शिफारस केलेली असून त्यानंतर उच्च शिक्षणाचे वर्ग सुरू केले जावेत. मुलाच्या भवितव्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र यावे असे आवाहन देखील या पत्रातून करण्यात आले आहे.

शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी लसीकरणाची अट देखील घालण्यात येऊ नये अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे. अनेक राज्यांनी केवळ मुलांचे लसीकरण झाले नसल्याने शाळा सुरू केलेल्या नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था