जम्मू काश्मीरमध्ये तेव्हाच शांतता नांदेल…. ; नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधावर एक वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानसोबत चर्चा केली जावी आणि जोवर तुम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करणार नाही तोपर्यंत जम्मू काश्मीर शांततेत राहू शकणार नाही. असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

Only then will there be peace in Jammu and Kashmir ….: National Conference leader Farooq Abdullah

स्वातंत्र्य पूर्व काळातील आठवनी सांगताना पुढे ते म्हणतात, भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्री असावी असं मला वाटतं. आधी लोक इथे सियालकोट वरून चहा पिण्यासाठी यायचे. आणि आम्ही सियालकोट ला देखील जायचो. पूर्वी असंच होतं. स्वातंत्र्यापूर्वी लोक रेल्वेने ये जा करायचे. मी आता खात्रीने सांगू इच्छितो की, जोपर्यंत तुम्ही पाकिस्तानशी चर्चा करणार नाही आणि एकमेकांशी मैत्रीपूर्ण हात मिळवणार नाही तोपर्यंत काश्मीर कधी शांततेमध्ये राहू शकणार नाही. आणि माझ्याकडून तुम्ही हे लिहून घ्या. असे देखील त्यांनी यावेळी ठासून सांगितले आहे.


फारुख अब्दुल्ला यांचे तालिबानवरचे प्रेम पुन्हा उफाळले; केंद्र सरकारला दिला चर्चेचा सल्ला


केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच झालेल्या नागरी हप्त्यांमध्ये काश्मिरींचा सहभाग नाही याआधी देखील त्यांनी हे वक्तव्य केले होते. काश्मिरींना बदनाम करण्याचे षड्यंत्र आखले जात आहे आणि म्हणून हे हल्ले केले जात आहेत असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. केंद्रशासित प्रदेशातील शांततामय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी वक्तव्य केले आहे.

Only then will there be peace in Jammu and Kashmir ….: National Conference leader Farooq Abdullah

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण