धक्कादायक अहवाल : हिमनद्या संपुष्टात आल्यास तीव्र पाणी टंचाई ; अब्जावधी लोकांची तहानही भागणे कठीण


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जागतिक हवामान व बदलाचे परिणाम हिमालयातील हिम नद्यांवर होत आहे. हवामान बदलांमुळे वेगानं वितळत आहे. हिमनद्या संकुचित होत आहेत. भविष्यात त्या वितळण थांबल्यास आणि संपुष्टात आल्यास 1 अब्ज नागरिकांना आपली ताहानही भागविता येणार नाही, असा इशारा आयआयटी तज्ज्ञानी दिला आहे. One billion people will not get water if himalayan glaciers stopped melting

भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) च्या संशोधनात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. आयआयटीचे सहाय्यक प्राध्यापक फारूक आजम यांचे संशोधन सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे. एका दशकापेक्षा जास्त काळापासून हिमनद्यांवरील हवामान बदलाच्या परिणामांचा शोध घेत आहेत.



“हिमालय-काराकोरमच्या ग्लेशिओ-हायड्रोलॉजी” च्या नवीन संशोधनानुसार, हिमनद्यांवर होणाऱ्या विपरित परिणामामुळे हिम नद्यांवर अवलंबून असलेल्या भारतासह शेजारच्या देशांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे आजम म्हणाले. प्राध्यापक फारूक आजम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमालय आणि काराकोरम पर्वतरांगांमधून वितरित होणाऱ्या हिमनद्यांमुळं सुमारे एक अब्जाहून अधिक लोकांना पाणी मिळतं.

हवामान बदलामुळे या शतकात बहुतेक हिमनग वितळून जातील आणि पाणीपुरवठा खंडित होईल, तेव्हा इतक्या मोठ्या लोकसंख्येला पाणी मिळणार नाही. हिमनगांमधून वितळणारं पाणी आणि हिमनद्यांवरील हवामान बदलाचे परिणाम सिंधू खोऱ्यात जाणवत आहेत. संशोधन पथकाने 250 हून अधिक अभ्यासपूर्ण संशोधन पत्रांचे निष्कर्ष आता एकत्र केले आहेत. हवामान, तापमानवाढ, पर्जन्यवृष्टी बदल आणि हिमनदी संकोचन यांच्यातील संबंधांविषयी माहिती घेतली जात आहे.

One billion people will not get water if himalayan glaciers stopped melting

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात