एकीकडे काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीची धांदल; दुसरीकडे AICC समोर पायलट समर्थकांचा गोंधळ


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षासाठी आज दिवसभर अतिशय घडामोडींचा दिवस आहे. एकीकडे काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची धांदल सुरू आहे, तर दुसरीकडे ऑल इंडिया काँग्रेस कमिटी मुख्यालयासमोर पायलट समर्थक गोंधळ घालत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना खासदार शशी थरूर यांनी आपला अर्ज दाखल केला आहे, तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन मल्लिकार्जुन खर्गे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे खर्गे यांच्या उमेदवारीचे सूचक बनले आहेत. On the one hand, the rigging of the Congress President election

 

शशी थरूर यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी आज सकाळी महात्मा गांधींच्या समाधी स्थळे जाऊन दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह 24 अकबर रोड येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात येऊन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज दाखल केला.

त्याच वेळी सचिन पायलट यांचे समर्थक मुख्यालयाबाहेर जमून घोषणाबाजी करत होते. सचिन पायलट हे राजस्थानातले जमिनी स्तरावरचे नेते आहेत. त्यांच्यासारख्या तरुण नेत्याकडेच राज्याचे नेतृत्व सोपवले पाहिजे, अशी मागणी या समर्थकांची होती.

मुख्यमंत्री अशोक गहलोत मात्र त्याच वेळी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटीला गेले होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन खर्गे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपण त्यांचे सूचक बनवणार आहोत, असे गहलोत यांनी पत्रकारांना सांगितले.

 

On the one hand, the rigging of the Congress President election

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात