PM Modi

पंतप्रधान मोदींचे नवरात्रीच्या ५व्या दिवशी ट्विट दुर्गा देवीकडून कृपाशिर्वाद मागितले

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींनी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत व सगळ्यांना आरोग्य व समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली आहे. रविवारी पंतप्रधान मोदीं यांनी ट्विटरवरून पाचव्या दिवसाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

On 5th day of Navratri PM Modi seeks for Goddess Durga Blessings on Twitter

मोदी यांनी कुष्मांडा देवी, स्कंदमाता देवी यांचे कृपाशिर्वाद मागितले. ते म्हणाले की, “नवरात्रीमध्ये देवी स्कंदमातेची पुजा केली जाते. मी देवी स्कंदमातेकडे प्रार्थना करतो की, “ती भक्तांना संकटावर मात करण्यासाठी शक्ती देवो.”


20 Years Of PM Modi : सार्वजनिक जीवनात पीएम मोदींची 20 वर्षे पूर्ण, ग्राफिक्समधून वाचा महत्त्वाच्या 20 फॅक्ट्स


पंतप्रधानांनी हिंदी भाषेत ट्विट केले आहे.

ते म्हणाले, “आम्ही कुष्मांडा देवीकडे प्रार्थना करतो की देवी आम्हाला आमच्या सर्व कार्यात यश देवो.” एका दुसऱ्या ट्विट मध्ये त्यांनी कुष्मांडादेवीस्तुतीचा व्हिडिओ अपलोड केला आहे.

शारदीय नवरात्रीत पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पुजा करण्यात येते. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या दिवशी पासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. नवरात्र नेहमी दहा दिवस साजरे केले जाते, पण या वर्षी ७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर असे आठचं दिवस असणार आहे. यावर्षी १३ ऑक्टोबरला अष्टमी व दसरा १५ ऑक्टोबरला  आहे.

On 5th day of Navratri PM Modi seeks for Goddess Durga Blessings on Twitter

महत्त्वाच्या बातम्या