वृत्तसंस्था
लंडन : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभर हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ३८ देशांत हा व्हेरियंट आता पसरला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना लागण होण्याचा वेग वाढला असून गेल्या चोवीस तासात ५० हजारांहून अधिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच आतापर्यंत शंभर जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. कॅनडात चोवीस तासात ओमिक्रॉनबाधित पंधरा जण आढळून आले. संसर्गात आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे लसीकरणात वेग वाढवण्याची सूचना दिली आहे. तसेच ५० पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. omricon spreads in 38 nations
दक्षिण आफ्रिकेत मुलांना कोरोनाची बाधा होत आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, पाच वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोरोनाची सर्वाधिक बाधा होत असून हीच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंताजनक बाब आहे. त्याचबरोबर ६० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना अधिक बाधा होत आहे. ओमिक्रॉनमुळे जगभरात अस्वस्थता पसरली असून ठिकठिकाणी नव्याने निर्बंध लादले जात आहेत. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचे नवीन ७५ रुग्ण आढळून आल्याने एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या १०४ झाली आहे. ब्रिटनमध्ये चोवीस तासात ५०,५८४ जणांना कोरोनाची लागण झाली असून १४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App