ओला-उबरचे भाव वाढणार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, नव्या वर्षात ऑटो बुकिंगवर जीएसटी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक जानेवारीपासून अनेक वस्तू आणि सेवांवरचा कर वाढविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. ज्या सेवा आतापर्यंत करप्रणालीच्या बाहेर होत्या, त्यांच्यावरही आता कर लावला जाणार आहे. ओला-उबरसारख्या सेवांवर आता कर लागणार आहे. यामुळे नागरिकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.Ola service will get costlier in next yearदरम्यान, या करवाढीचा परिणाम सामान्य ऑटोरिक्षावर होणार नाही. ते अजूनही जीएसटी कर प्रणालीच्या बाहेर आहेत. पण यामुळे ऑटो चालकांची मनमानी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऑनलाईन बुकिंग महागल्यामुळे नागरिक ऑफलाईन बुकिंगकडे वळू शकतात. त्यामुळे ऑफलाईन ऑटो चालकही दरात वाढ करू शकतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

जीएसटी कौन्सिलने मागील महिन्यात काही करविषयक निर्णय घेतले. यात एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या रेडिमेड कपडे आणि बुटांवरचा जीएसटी ५ टक्क्यांवरून वाढून १२ टक्के करण्यात येणार आहे. ऑनलाईन फूड ऑर्डर सेवेत आता हॉटेल्सकडून कर न घेता सेवा देणाऱ्या कंपनीलाच कर भरावा लागणार आहे. त्याशिवाय ऑनलाईन कॅब बुकिंगवरही कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ola service will get costlier in next year

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण