वृत्तसंस्था
गुवाहाटी : आसामच्या चहा कंपनीने युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांचे नाव चहाला देऊन त्यांचा गौरव केला आहे. युक्रेन राशियाबरोबरच्या युद्धात जिंकणार नाही, हे माहित आहे. परंतु त्यांचं नाव आम्ही चहाला दिले, असे कंपनीचे मालक म्हणाले. Now drink Zhelensky tea; Tea from a company in Assam named after the President of Ukraine
आसामस्थित अरोमिका टी-कंपनीने मालक रणजीत बरुआ म्हणाले, कोणाच्याही मदतीशिवाय रशियन सैन्याशी लढणाऱ्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सामर्थ्याला, धैर्याला आणि संयमाला आम्ही सलाम करतो. झेलेन्स्कींना माहिती होते की रशियाविरुद्ध विजय मिळवणे त्यांच्यासाठी सोपे नाही, तरीही त्यांनी लढा सुरूच ठेवला. सीटीसी चहाचा ब्रँड ‘झेलेन्स्की’ बुधवारी बाजारात दाखल झाला. हा चहा ऑनलाइनही विकत घेता येणार आहे. . बरुआ यांच्या मते या चहाची चव इतर चहाच्या चवीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App