Love Jihad : आता केरळच्या कम्युनिस्टांनीही केले कबूल, बिगर मुस्लिम मुलींसाठी लव्ह जिहादचा धोका गंभीर, पक्षांतर्गत पत्रके वाटून जनजागृती!

Now Communists accepted that Love Jihad is serious harm For non-Muslims in Kerala

 Love Jihad : जोपर्यंत तुमच्यावर संकट येत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचे गांभीर्य कळत नाही. लव्ह जिहादबद्दल जेव्हाही चर्चा झाली, तेव्हा डाव्यांनी ‘भाजप आणि आरएसएसचे षडयंत्र’ म्हणून त्याची खिल्ली उडवली. केरळचे ख्रिश्चनसुद्धा कट्टरपंथी मुस्लिमांच्या वाढत्या अत्याचाराला बळी पडत आहेत, हे जाणूनही केरळचे डावे या विषयावर भाजपची उघडपणे थट्टा करण्यात कोणतीही कसर सोडत नव्हते. पण आता खुद्द केरळच्या सत्ताधारी डाव्यांनाही हे स्वीकारावे लागतंय की, लव्ह जिहाद ही खरोखर एक गंभीर समस्या बनलेली आहे. Now Communists accepted that Love Jihad is serious harm For non-Muslims in Kerala


वृत्तसंस्था

तिरुवनंतपुरम : जोपर्यंत तुमच्यावर संकट येत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचे गांभीर्य कळत नाही. लव्ह जिहादबद्दल जेव्हाही चर्चा झाली, तेव्हा डाव्यांनी ‘भाजप आणि आरएसएसचे षडयंत्र’ म्हणून त्याची खिल्ली उडवली. केरळचे ख्रिश्चनसुद्धा कट्टरपंथी मुस्लिमांच्या वाढत्या अत्याचाराला बळी पडत आहेत, हे जाणूनही केरळचे डावे या विषयावर भाजपची उघडपणे थट्टा करण्यात कोणतीही कसर सोडत नव्हते. पण आता खुद्द केरळच्या सत्ताधारी डाव्यांनाही हे स्वीकारावे लागतंय की, लव्ह जिहाद ही खरोखर एक गंभीर समस्या बनलेली आहे.

पक्षांतर्गत वाटली पत्रके

अलीकडेच केरळमधील सत्ताधारी सीपीआय [एम] सरकारशी संबंधित एक अंतर्गत पत्रक सोशल मीडियावर लीक झाले आहे. हे पत्रक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

या अंतर्गत पत्रकात सत्ताधारी माकपने पहिल्यांदा ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. मल्याळममध्ये लिहिलेल्या या चिठ्ठीचे नाव ‘अल्पसंख्याक सांप्रदायिकता’ आहे, ज्यात त्यांनी केरळमधील अतिरेकी इस्लामिक संघटनांकडून गैर-मुस्लिम मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल कबुली दिली आहे आणि चिंता व्यक्त केली आहे.

या व्यतिरिक्त, 16 सप्टेंबर रोजी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पत्रके वाटली होती, ज्यात स्पष्टपणे इशारा दिला होता की कट्टरपंथी मुस्लिम महाविद्यालयीन मुलींना दहशतवादाकडे कसे आकर्षित करत आहेत आणि त्यांना राज्यात अराजक कसे निर्माण करायचे आहे.

कम्युनिस्ट पक्षाच्या मते, “तरुणांना सांप्रदायिक उपक्रम आणि अतिरेकी विचारसरणीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी खास सुशिक्षित तरुण मुलींना लक्ष्य केले जात आहे. सीपीआयची विद्यार्थी संघटना आणि युवा संघटना या दोघांनीही याची स्पष्ट नोंद घ्यावी.”

ख्रिश्चनांनीही डाव्यांचे वेधले लक्ष

यापूर्वी केरळच्या ख्रिश्चनांनीही याकडे सत्ताधारी कम्युनिस्ट सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. कोट्टायममधील पाला चर्चचे फादर जोसेफ कलरंगत यांनी लव्ह जिहाद आणि नार्कोटिक्स जिहादच्या विरोधात जनतेला इशारा देत म्हटले की, “कट्टरपंथी संघटना आणि त्यांचे अनुयायी अशा पद्धती वापरत आहेत जिथे शस्त्रे वापरली जाऊ शकत नाहीत आणि कॅथलिक कुटुंबांनी या संदर्भात सावधगिरी बाळगली पाहिजे. केरळमध्ये एक विशेष गट आहे जो कॅथलिक आणि हिंदू तरुणांना वेगवेगळ्या भागात ड्रग्ज आणि इतर ड्रग्जचे व्यसन लावत आहे. अशा लोकांचा हेतू इतर धर्मांना भ्रष्ट करणे आहे. लव्ह जिहाद आणि नार्कोटिक्स जिहाद या दोन अशा गोष्टी आहेत, ज्याकडे लक्ष दिले पाहिजे. केरळ हे दहशतवाद्यांचे भरती केंद्र बनत असल्याचेही माजी डीजीपी म्हणाले होते. येथे दहशतवाद्यांचे स्लीपर सेल असल्याचीही चर्चा होत असते.

केरळच्या डाव्यांनीही लव्ह जिहाद गंभीर समस्या असल्याचे स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. केरळमधील बिगर मुस्लिम मुलींना कट्टरपंथी मुस्लिमांमुळे जगणे कठीण झाले आहे आणि ‘लव्ह जिहाद’ ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. डाव्यांना उशिरा सुचलेले हे शहाणपण म्हणावे लागेल.

Now Communists accepted that Love Jihad is serious harm For non-Muslims in Kerala

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण