लखीमपूर खेरी प्रकरणात हिंदू विरूद्ध शिख धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न, भाजपचे खासदार वरूण गांधी यांचा आरोप


लखीमपूर खेरी प्रकरणात हिंदू विरूद्ध शिख असा धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: लखीमपूर खेरी प्रकरणात हिंदू विरूद्ध शिख असा धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी केला आहे.Not only is this an immoral & false narrative, it is dangerous to create these fault-lines & reopen wounds that have taken a generation to heal.We must not put petty political gains above national unity

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याप्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलगा आशिष मिश्रा याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून वरूण गांधी यांनी ट्वीट करत गंभीर आरोप केला आहे.

खासदार वरूण गांधी हे मागील काही महिन्यांपासून भाजपच्या ध्येय धोरणांवर टिका करत आहे. लखीमपूर खेरी या प्रकरणावरून त्यांनी यापूर्वीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यामुळे त्यांना व आई मनेका गांधी यांना भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळले आहे. आता पुन्हा त्यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
वरुण गांधी यांनी केलेले ट्विट

Not only is this an immoral & false narrative, it is dangerous to create these fault-lines & reopen wounds that have taken a generation to heal.We must not put petty political gains above national unity

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण