वृत्तसंस्था
गुवाहाटी : भारताचे ‘गुजरात ते बंगाल’ असे वर्णन करणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात आसामच्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा अंगुरलता यांनी दिसपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भारताचे ‘गुजरात ते बंगाल’ असे वर्णन करताना राहुल गांधी हे पूर्वोत्तर राज्यांना भारताचा भाग मानत नसल्याचा आरोप त्यांनी केला असून त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. Northeastern states are not part of India, India is described only as ‘Gujarat to Bengal’; Complaint against Rahul Gandhi
भारताचे ‘गुजरात ते बंगाल’ असे वर्णन करून राहुल गांधी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या या या ट्विटवरून राजकारण चांगलेच तापले आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, आसामच्या भाजप महिला मोर्चाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दिसपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आसामच्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा अंगुरलता देखणे यांनी या ट्विटवरून राहुल गांधींवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये भारताचे वर्णन ‘गुजरात ते पश्चिम बंगाल’ असे केले आहे. त्यात पूर्वोत्तर राज्यांचा नामोल्लेख केला नसल्याने ही राज्ये देखील भारताचा भाग आहेत, याचे भान त्यांनी राखले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App