सुरक्षेला बाधा ठरणाऱ्या ५४ चीनी अ‍ॅपवर बंदीचा निर्णय


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय सुरक्षेला बाधक ठरणाऱ्या ५४ चिनी मोबाइल अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यांनी सोमवारी घेतला. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाने या अ‍ॅपवर भारतात बंदी घालण्याची औपचारिक अधिसूचना जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.Fwd: Threat to Security, ban on 54 Chinese apps

बंदी घातलेल्या अ‍ॅपमध्ये स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा, म्युझिक प्लेअर, म्युझिक प्लस, व्हॉल्यूम बूस्टर, व्हिडीओ प्लेअर मीडिया, विवा व्हिडीओ एडिटर, नाइस व्हिडीओ बायडू, अ‍ॅपलॉक, अ‍ॅस्ट्राक्राफ्ट यासंह विविध अ‍ॅपचा समावेश आहे.



चिनी मोबाइल अ‍ॅपवर दुसऱ्यांदा कारवाई करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जून २०२१मध्ये सरकारने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. टिकटॉक, यूसी ब्राऊझर, वुईचॅट, बिगो लाइव्ह यांसह विविध अ‍ॅपचा यामध्ये समावेश होता. हे अ‍ॅप देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्व यांस प्रतिकुल असल्याचे त्यावेळी सरकारने सांगितले होते.

Fwd: Threat to Security, ban on 54 Chinese apps

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात