गुजरातमधील एका मच्छीमाराचा पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू , मृत्यूचे नेमके कारण उघड झाले नाही


पाकिस्तानी सागरी सुरक्षा यंत्रणेने आपल्या सागरी हद्दीत शिरकाव केल्याचा कांगावा करत मागील वर्षी सोलंकीला पकडले.त्यानंतर वर्षभरापासून तो पाकिस्तानी कैदेत होता.A fisherman from Gujarat has died in a Pakistani jail, the exact cause of death has not been revealed


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : गुजरातमधील एका मच्छीमाराचा पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू झाला.जयंती सोलंकी (वय 50) असे मृत मच्छीमाराचे नाव आहे.दरम्यान मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजले नाही.पाकिस्तानी सागरी सुरक्षा यंत्रणेने आपल्या सागरी हद्दीत शिरकाव केल्याचा कांगावा करत मागील वर्षी सोलंकीला पकडले.



त्यानंतर वर्षभरापासून तो पाकिस्तानी कैदेत होता.काही आठवड्यांपूर्वी त्याचे निधन झाले.मात्र, त्याविषयीची माहिती गुजरात प्रशासनाला रविवारी समजली.

जयंती सोलंकीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने तातडीने एक पथक अट्टारी-वाघा सीमेवर पाठवले.ते पथक सोलकींचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवेल.पाकिस्तानी सागरी यंत्रणा सातत्याने कुरापती करून भारतीय मच्छीमारांना भर समुद्रात ताब्यात घेते. पाकिस्तानच्या कैदेत अजूनही अनेक भारतीय मच्छीमार आहेत.

A fisherman from Gujarat has died in a Pakistani jail, the exact cause of death has not been revealed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात