२५ – ३० नक्षलवादी जंगलात घुसून मारलेत, ऑपरेशन मोठे आहे; गुप्तचर यंत्रणेवर बोट ठेवणाऱ्यांना सीआरपीएफचे चोख प्रत्युत्तर


वृत्तसंस्था

विजापूर – छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीवर राजकारण सुरू असताना गुप्तचर यंत्रणांवर काही राजकीय पक्षांनी अपयशाचे खापर फोडले. पण त्याला सीआरपीएने चोख प्रत्युत्तर दिले असून २५ ते ३० नक्षलवादी आपल्या जवानांनी मारले आहेत. नक्षलवाद्यांविरोधातले ऑपरेशन मोठे आहे. ते सुरूच राहणार आहे, असे सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. No operational, intel failure, over 25-30 Naxals killed in Bijapur encounter: DG CRPF Kuldiep Singh

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार कुलदीप सिंग यांनी छत्तीसगडमध्ये येऊन नक्षलवाद विरोधातील मोहिमेची सूत्रे हातात घेतली आहेत. जे गुप्तचर यंत्रणांवर बोट ठेवतात, त्यांना ऑपरेशनची पुरेशी माहिती नाही, असे सांगून कुलदीप सिंग म्हणाले, की हे नक्षलवाद्यांच्या हालचालींची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली नव्हती, हे म्हणणे पूर्णतः चूकीचे आहे.



गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे तर जंगलात घुसून आपले जवान ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी २५ ते ३० नक्षलवादी मारले आहेत. हे सहज साध्य झालेले नाही. यात गुप्तचर आणि ऑपरेशनल फोर्स या दोन्ही घटकांचे योगदान आहे. हे ऑपरेश मोठे आहे आणि पुढेही सुरू राहणार आहे.

आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २२ जवानांचे मृतदेह हाती लागले असून १ कोब्रा जवान अजून बेपत्ता आहे. ३१ जवान जखमी झाले असून त्या सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते सगळे सुरक्षित आहेत. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराजन यांनी ही माहिती दिली.

No operational, intel failure, over 25-30 Naxals killed in Bijapur encounter: DG CRPF Kuldiep Singh

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात