दानह, दमण दीव मध्ये नितीश कुमारांचा पक्ष संयुक्त जनता दल संपुष्टात!!; कार्यकारिणीसह 15 झेडपी सदस्य भाजपात सामील!!


प्रतिनिधी

दानह : दादरा नगर हवेली दमण दीव केंद्रशासित प्रदेशात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल पक्ष राजकीय दृष्ट्या संपुष्टात आला असून संयुक्त जनता दलाच्या 15 जिल्हा परिषद सदस्यांनी पक्षत्याग करून थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संयुक्त जनता दलाची प्रदेश शाखा देखील विसर्जित झाली असून संपूर्ण प्रदेश शाखाच भाजपमध्ये विलीन केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष धर्मेश चौहान यांनी केली आहे. Nitish Kumar’s party Samyukt Janata Dal ends in Danah, Daman Diu

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून लालूप्रसाद यादव यांच्या जनता दलाची साथ घेऊन सत्तापलट घडवला. पढ या सत्तापलटानंतर संयुक्त जनता दल पहिल्यांदा मणिपूरमध्ये फुटला आणि आता केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली दमण दीव मध्ये पक्षाची संपूर्ण शाखाच भाजपमध्ये विलीन झाली आहे.

दादरा नगर हवेली दमण दीव मध्ये परिवार वाद आणि दहशतवादाचा अंत होऊन आता विकासाचे ट्रिपल इंजिन वेगाने धावेल, असा विश्वास धर्मेश चव्हाण आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव तसेच दमण दीवच्या प्रभारी विजया रहाटकर यांनी व्यक्त केला आहे.

दादरा नगर हवेली जिल्हा पंचायतीत संयुक्त जनता दलाच्या तिकिटावर 17 सदस्य निवडून आले होते. त्यापैकी 15 सदस्य आज भाजपमध्ये सामील झाले. संयुक्त जनता दलाचे दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये सामील झाल्याने त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. जिल्हा परिषदेत भाजपचे 3 सदस्य आहेत. त्यात आता 15 सदस्य सामील झाल्यानंतर एकूण सदस्य संख्या 18 झाली आहे. 20 सदस्यांच्या जिल्हा परिषद सभागृहात भाजपला तीन चतुर्थांश पेक्षा अधिक बहुमत मिळाले आहे.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष श्रीमती निशा भंवर यादेखील भाजपमध्ये सामील झाल्याने जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली आहे.

भाजपा मध्ये सामील झालेल्या सर्व 15 सदस्यांनी प्रशासक श्री प्रफुल्ल खोडा पटेल यांच्याकडे कायदेशीर याचिका दाखल केली असून आपण स्वेच्छेने भाजपात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर संयुक्त जनता दलाची संपूर्ण प्रदेश कार्यकारणी धर्मेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये सामील झाली असून त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह सिल्वासा मधील अटल भवन मध्ये पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर केला आहे.

सिल्वासा नगरपरिषदेत आधीच भाजपची सत्ता निवडणुकीतच आली आहे आणि त्यात आता जिल्हा परिषदेत संपूर्ण संयुक्त जनता दल पक्षच भाजपमध्ये विलीन झाल्याने जिल्हा परिषदेवर देखील भाजपची सत्ता आली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपचा भाजपची साथ सोडून गुंड आणि भ्रष्टाचारी घराणेशाहीचा यांचा पक्ष असलेला राष्ट्रीय जनता दलात बरोबर सरकार बनवले. संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर बनत असताना नितीश कुमार यांनी घराणेशाही पार्टीला बरोबर घेतले. त्यांचा हा निर्णय जनमताच्या कौला विरोधात आणि अयोग्य असल्याचे आम्हाला वाटल्याने आम्ही संयुक्त जनता दलाची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे धर्मेश चौहान यांनी जाहीर केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आम्हा सर्व जिल्हा परिषद सदस्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या विकासदृष्टीने आम्ही दादरा नगर हवेलीचा विकास करू, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती निशा भंवर यांनी दिली.

सर्व सदस्यांचे स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष श्री दीपेश टंडेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासदृष्टीतून संपूर्ण प्रदेशाचा विकास करण्याची ग्वाही दिली. यामध्ये संयुक्त जनता दलातून भाजपमध्ये आलेल्या सर्व सदस्यांचे योगदान मोठे राहील, असा विश्वास व्यक्त केला.

संयुक्त जनता दलातून भाजपमध्ये सामील झालेल्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांचे आणि प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यांचे स्वागत भाजपच्या राष्ट्रीय सचिव श्रीमती विजया रहाटकर आणि प्रदेशाध्यक्ष श्री दीपेश टंडेल यांनी केले.

या जिल्हा परिषद सदस्यांनी केला भाजपात प्रवेश

1. वैशालीबेन पटेल (दादरा)
2. वंदनाबेन पटेल (नरोली)
3. जशोदाबेन पटेल (खरडपाडा)
4. गोविंदभाई भुजाडा (गलोंडा)
5. मीनाबेन वरठा (किलवणी)
6. रेखाबेन पटेल (मसाट)
7. दीपककुमार प्रधान (रखोली)
8. प्रवीणभाई भोया (सायली)
9. दीपकभाई पटेल (अंबोली)
10. विजय टेंबरे (कौंचा)
11. ममताबेन सवर (दुधनी)
12. निशाबेन भंवर (खानवेल)
13. सुमनबेन गोरखना (रूदाना)
14. पार्वतीबेन नडगे (मांदोनी)
15. विपुलभाई भुसारा (सिंदोनी)

Nitish Kumar’s party Samyukt Janata Dal ends in Danah, Daman Diu

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात