jama khan said i am a descendant of bhagwan singh : देशभरात धर्मांतरावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बिहारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि जेडीयू नेते जमा खान यांनी एक मोठा खुलासा केला आहे. हाजीपूरमध्ये मंत्री खान म्हणाले की, त्यांचे पूर्वज राजपूत होते. पण त्यांनी इस्लाम स्वीकारला. यामुळे ते इस्लाम धर्म पाळत आहेत. त्यांचे काही नातेवाईक आहेत, जे अजूनही राजपूत आहेत आणि त्यांचेही त्यांच्याशी संबंध आहेत. nitish kumars minister jama khan said i am a descendant of bhagwan singh ancestors had accepted islam
विशेष प्रतिनिधी
हाजीपूर : देशभरात धर्मांतरावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बिहारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि जेडीयू नेते जमा खान यांनी एक मोठा खुलासा केला आहे. हाजीपूरमध्ये मंत्री खान म्हणाले की, त्यांचे पूर्वज राजपूत होते. पण त्यांनी इस्लाम स्वीकारला. यामुळे ते इस्लाम धर्म पाळत आहेत. त्यांचे काही नातेवाईक आहेत, जे अजूनही राजपूत आहेत आणि त्यांचेही त्यांच्याशी संबंध आहेत.
बिहारमधील हाजीपूर गेलेले मंत्री जमा खान यांना धर्म परिवर्तनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले की, कोणी स्वत:च्या इच्छेनुसार धर्मांतर केले तर ते चुकीचे नाही. पण जर कोणी पैशाचे आमिष देऊन जबरदस्तीने धर्मांतर केले तर ते चुकीचे आहे. असे कोणतेही प्रकरण समोर आले तर सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. ते म्हणाले की, यावेळी मुस्लिमांनी जेडीयूला मतदान केले नाही. पण तरीही मुख्यमंत्री मुस्लिमांची काळजी घेतात.
नितीश कुमार यांचे कॅबिनेट मंत्री जमा खान म्हणाले की, मी स्वत:देखील एक राजपूत होतो. आमचे पूर्वज जयरामसिंह आणि भगवानसिंह वैश्वबाडाहून आले होते. येथे एक लढाई सुरू होती त्यात त्यांचा पराभव झाला. यानंतर भगवानसिंह यांनी इस्लाम स्वीकारला आणि ते मुस्लिम बनले. पण आमचे इतर नातेवाईक, जे सरैंया गावचे आहेत, ते जयरामसिंह यांच्या कुटुंबातील असून राजपूत आहेत. आजही त्यांचा त्यांच्याशी संबंध आहे. म्हणूनच कोणी कोणालाही धर्म बदलण्यास भाग पाडू शकत नाही. जर असे कुठे घडले तर त्यासाठी पोलीस आणि कायदा आहे.
nitish kumars minister jama khan said i am a descendant of bhagwan singh ancestors had accepted islam
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App