पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीतील बॉंबस्फोटप्रकरणी नऊ दहशतवादी दोषी


विशेष प्रतिनिधी

पाटणा – २०१३ च्या गांधी मैदानात आयोजित नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी नऊ दहशतवाद्यांना दोषी ठरवण्यात आले. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू तर ८३ जण जखमी झाले होते.Nine terrorist guilty in Bomb blast case

इम्तियाज अहमद सिठियो (रांची), उमर सिद्दिकी नुराणी (रायपूर), अझरुद्दीन नियर मैरिना बस्ती (रायपूर), हैदर अली ऊर्फ अब्दुल्लाह ऊर्फ करिया ऊर्फ ब्लॅक (रांची), अहमद हुसेन (मिर्झापूर), नुमान अन्सारी सिठियो (रांची), इप्तिखार आलम धुर्वा (रांची), फिरोज आलम (रांची) यांना दोषी ठरवण्यात आले.



२७ ऑक्टोबर २०१३ रोजी नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेदरम्यान साखळी स्फोट झाल्यानंतर गांधी मैदानाबरोबरच रेल्वे पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. एनआयएने या प्रकरणी २२ ऑगस्ट २०१४ रोजी एकुण ११ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. यात एक अल्पवयीन आरोपी असल्यामुळे त्याच्यावर बालन्यायालयात सुनावणी झाली.

एनआयए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश गुरुविंदर सिंह मल्होत्रा यांनी निकाल दिला. एक आरोपी फकरुद्दीन याला सबळ पुराव्याअभावी सुटका करण्यात आली. त्याचबरोबर शिक्षा सुनावण्यासाठी १ नोव्हेंबरची तारीख निश्चिटत करण्यात आली आहे.

Nine terrorist guilty in Bomb blast case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात