पुण्यातील कोंढव्यात एनआयएकडून छापेमारी, दहशतवादी संघटनेच्या संशयितांच्या घराच्या घेतली झडती


विशेष प्रतिनिधी

पुणे : भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या ‘Islamic State Khorasan Province (ISKP) कारवायांचा एक भाग म्हणून भारतात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखल्याच्या आणि आयएसआयएसच्या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीचा प्रचार केल्याप्रकरणी एनआयएने सोमवारी पुण्यात छापेमारी करीत एका संशयिताच्या घराची झडती घेतली.NIA raids Kondhwa in Pune, raids house of suspected terrorist

पुण्यातील कोंढवा येथील तलहा खान (३८) याच्या घराची झडती घेण्यात आली, असे तपास संस्थेच्या अधिकाऱ्याने सांगितले. दिल्लीतील ओखला विहार, जामिया नगर येथून काश्मिरी जोडपे जहांजैब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग यांना अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (लोधी कॉलनी) हा गुन्हा दाखल केल्याचे एनआयएक्या अधिकाऱ्याने सांगितले.



या जोडप्याचे आयएसकेपीशी संबंध होते. ही दहशतवादी संघटना असून आयएसआयएसचा एक भाग आहे. विध्वंसक आणि देशविरोधी कारवायांमध्ये ही संघटना सामील असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे तिच्यावर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. एनआयएच्या दुसर्‍या एका प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेल्या अब्दुल्ला बासिथ याच्या संपर्कात आरोपी असल्याचेही आढळून आले.

अब्दुल्ला बासिथ, सादिया अन्वर शेख, नबील सिद्दिक खत्री आणि अब्दुर रहमान या चार आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्याने सांगितले.भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून इसिसची विचारधारा पसरवण्याचा कट रचणे,

इसिससाठी काम करण्यासाठी सेलची स्थापन करणे, त्याकरिता निधी उभारणे, शस्त्रे गोळा करणे, आयईडी बनवणे आणि लक्ष्य साध्य करणे यासाठी सहा आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.
संशयित तलहा खानच्या घराच्या झडतीदरम्यान, विविध कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

NIA raids Kondhwa in Pune, raids house of suspected terrorist

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात