वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ओमिक्रॉनमुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली गेले आहे. दरम्यान, मागील अनुभव पाठिशी असल्याने भारतात तात्काळ याप्रकरणी बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. याच दरम्यान आता केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही नवी मार्गदर्शक तत्त्व 1 डिसेंबर 2021 पासून लागू होणार आहेत. NEW GUIDELINES: New Centre’s Rules Against Omicron Background; Restrictions on travelers to India from 12 countries; Read detailed
#Omicron: Union Health Ministry revises guidelines for international arrivals in India to be effective from Dec 1; mandates submitting 14 days travel details, uploading negative RT-PCR test report on Air Suvidha portal before the journey pic.twitter.com/zJBdpShBtE — ANI (@ANI) November 28, 2021
#Omicron: Union Health Ministry revises guidelines for international arrivals in India to be effective from Dec 1; mandates submitting 14 days travel details, uploading negative RT-PCR test report on Air Suvidha portal before the journey pic.twitter.com/zJBdpShBtE
— ANI (@ANI) November 28, 2021
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Omicron Variant)आढळून येण्याची शक्यता जास्त आहे त्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच कोव्हिड-19 चाचणी केली जाईल.
दरम्यान, त्या व्यक्तींचा चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत तिथे थांबावे लागेल. तसंच जरी टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाईनमध्येच राहावे लागणार आहे. तसेच आठव्या दिवशी पुन्हा कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे.
केंद्र सरकारने 12 देशांची यादी तयार केली आहे. यामध्ये यूके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यासह युरोपातील सर्व देशांचा समावेश आहे. या देशांव्यतिरिक्त इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळाबाहेर येण्याची परवानगी असेल. त्यामुळे त्यांना 14 दिवस निरीक्षणाखाली राहावे लागणार आहे.
कोरोनाच्या दोन लाटांनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Omicron Variant) जगभरात भीतीचं सावट पसरलं आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट (उत्परिवर्तित विषाणूचा प्रकार) आढळला असून, तो डेल्टापेक्षाही घातक असल्याचं सांगितलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं असून, व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित केलं आहे. यामुळे जगभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही देशांनी प्रतिबंधात्मक उपायांचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेसह त्या खंडातील सहा देशांतील प्रवासावर निर्बंध जारी केले आहेत. भारतातही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरूवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी बैठक घेतली. ज्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवी गाइडलाइन जारी केली जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App