चिंताजनक : महामारीमुळे लहानग्यांवर नकारात्मक प्रभाव, देशात वयाच्या दहाव्या वर्षापासूनच मुले सोशल मीडियावर सक्रिय, NCPCRचा अहवाल

NCPCR Study shows that 37 Percent 10 Year Olds Have Facebook Accounts, 24 Percent On Instagram Against Rules

NCPCR Study :  नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) ने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राबविलेल्या लॉकडाऊनदरम्यान ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वापरावर अभ्यास केला आहे. यात असे आढळले की, 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलेदेखील सोशल मीडियावर सक्रिय आहेत. NCPCR Study shows that 37 Percent 10 Year Olds Have Facebook Accounts, 24 Percent On Instagram Against Rules


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) ने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राबविलेल्या लॉकडाऊनदरम्यान ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वापरावर अभ्यास केला आहे. यात असे आढळले की, 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलेदेखील सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सच्या अभ्यासानुसार, देशात दहा वर्षांखालील 37.8% मुलांचे फेसबुक अकाउंट आहे. समान वयोगटातील 24.3 टक्के मुले इन्स्टाग्रामवर सक्रिय आहेत. एनसीपीसीआरचे म्हणणे आहे की, हे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे तयार केलेल्या निकषांच्या अगदी विरोधात आहे.

खाते असण्यासाठी वयोमर्यादा किती?

फेसबुक आणि इंस्टाग्रामवर खाते उघडण्याचे किमान वय 13 वर्षे वयोमर्यादेची अट आहे. मोबाइल फोन आणि इतर उपकरणांच्या वापराचा मुलांवर होणारा परिणाम यासंदर्भात एनसीपीसीआरने हा अभ्यास केला आहे.

लहानग्यांची सोशल मीडियावर अशी होते एंट्री

एनसीपीसीआरने म्हटले की, ‘या अभ्यासात असे आढळले आहे की दहा वर्षांखालील मुले मोठ्या संख्येने सोशल मीडियावर सक्रिय आहेत. १० वर्षांखालील सुमारे 37.8% मुलांचे फेसबुक अकाउंट आहे आणि त्याच वयोगटातील 24.3% मुले इन्स्टाग्रामवर कार्यरत आहेत. एनसीपीसीआरने केलेल्या अभ्यासानुसार एक विचार करण्यासारखी बाब समोर आली आहे, ती म्हणजे बर्‍याच मुलांना त्यांच्या पालकांच्या मोबाइल फोनद्वारे सोशल मीडिया आणि इंटरनेटवर एंट्री मिळते. या अभ्यासामध्ये एकूण 5,811 जणांचा समावेश होता. यामध्ये 3,491 मुले, 1534 पालक, 786 शिक्षक आणि 60 शाळांचा समावेश करण्यात आला आहे.

मुलांसाठी चांगला कंटेंट नाही

कोरोना साथीच्या वेळी झालेल्या सर्वेक्षणात असे सांगितले गेले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बर्‍याच प्रकारचे कंटेंट आहेत, त्यापैकी बर्‍याच मुलांसाठी ते योग्य नाहीत. यापैकी काही कंटेंट हिंसक किंवा अश्लील किंवा ऑनलाईन गैरवर्तन आणि मुलांना धमकावण्याशी संबंधित असू शकते. म्हणूनच यासंदर्भात योग्य निरीक्षण व कठोर नियमांची आवश्यकता आहे.

महामारीमुळे मुलांवर नकारात्मक प्रभाव

अभ्यासानुसार, 29.7 टक्के मुलांवर महामारीचा अत्यंत नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर 43.7 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, त्याचा त्यांच्या शिक्षणावर फारच नकारात्मक परिणाम झाला आहे. अहवालात पुढे असे म्हटले आहे की, सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना असे वाटते की, साथीच्या आजारामुळे त्यांचे शिक्षण प्रभावित झाले आहे आणि ऑनलाईन शिक्षण पुरेसे नसून ते चांगल्या पद्धतीने होतही नाहीये.

NCPCR Study shows that 37 Percent 10 Year Olds Have Facebook Accounts, 24 Percent On Instagram Against Rules

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात