नौदल दिवस 2021 : जगातील सर्वात मोठा ध्वज तिरंगा गेट वे ऑफ इंडिया येथे फडकवण्यात आला


विशेष प्रतिनिधी

मुबंई : 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झाले. या युद्धानंतर 4 डिसेंबर हा दिवस इंडियन नेव्ही दिवस साजरा केला जाईल असे ठरवण्यात आले होते. त्यानंतर 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर हा नेव्ही आठवडा म्हणून साजरा केली जाईल, असे देखील ठरवण्यात आले होते. 1972 मध्ये झालेल्या सीनिअर नेव्ही ऑफिसरच्या कॉन्फरन्समध्ये हा निर्णय घेण्यात आला होता.

Navy Day 2021: The world’s largest flag was hoisted at the Gateway of India

तर आज 4 डिसेंबर आहे आणि आज राष्ट्रीय नौदल दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून इंडियन नेव्हीने जगातील सर्वात मोठा फ्लॅग गेटवे ऑफ इंडिया येथे फडकावला आहे. 1400 केजी इतके वजन असलेला हा खादीपासून बनवलेला फ्लॅग खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनद्वारे बनवण्यात आला आहे.

आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवर या फ्लॅग होस्टिंगची माहिती देत इंडियन नेव्हीने लिहीले आहे की, स्वत:ला राष्ट्राच्या सेवेसाठी आम्ही समर्पित करतो. राष्ट्रीय हितसंबंधाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तसेच भारतीय लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमच्या या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग छोटासा मार्ग म्हणजे हा राष्ट्रध्वज आम्ही आज गेट वे ऑफ इंडिया येथे स्थापन केला आहे.


Indian Army Recruitment 2021 : भारतीय सैन्यात 189 पदांवर भरती, 2.5 लाखांपर्यंत मिळेल वेतन


सामान्य माणसांमध्ये इंडियन नेव्हीबद्दल जागरुकता निर्माण व्हावी आणि नेव्ही त्यांच्यासाठी करत असलेल्या कार्याची पोहोच व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

21 ऑक्टोबर 1944 रोजी रॉयल इंडियन नेव्ही तर्फे सर्वात प्रथम नेव्ही डे सेलिब्रेट करण्यात आला होता. त्यानंतर 1972 पर्यंत 15 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जायचा. 15 डिसेंबर ज्या आठवड्यांमध्ये येईल तो आठवडा नेव्ही वीक म्हणून साजरा केला जायचा. पण आता तो 4 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

Navy Day 2021: The world’s largest flag was hoisted at the Gateway of India

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण