पोलीसांवर नवज्योत सिंग सिध्दू यांचे आक्षेपार्ह वक्तव्य, म्हणे आमदार इतके खमके होते की त्यांच्या भीतीने पोलीसांची पँट ओली व्हायची


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : बेताल वक्तव्य करण्यात प्रसिध्द असणारे पंजाब कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांनी पोलीसांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. पंजाबच्या कपूरथला जिल्ह्यातील सुलतानपूर लोधी भागामध्ये झालेल्या जाहीर सभेतकाँग्रेस आमदार नवतेज सिंग चीमा यांचे कौतुक करताना सिध्दू म्हणाले,Navjot Singh Sidhu’s offensive statement against the police, He said that the MLAs were so tough that the police pants would get wet due to their fear

नवतेज चीमा हे त्यांच्या काळात इतके खमके होते, की त्यांच्या भितीने पोलिसांना देखील पँट ओली करायला लावत होते.सिद्धू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धू पोलीस विभागाविषयी आक्षेपार्ह भाषेमध्ये भर सभेत वक्तव्य करताना दिसत आहेत. या विधानावर सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे.चंदीगडचे डीएसपी दिलशेर सिंग चंडेल यांनी सिद्धूंना खरमरीत उत्तर दिलं आहे. त्यांच्या विधानावर तीव्र नापसंती दर्शवली असून त्यांना नोटीस देखील पाठवली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

सिद्धू यांच्या विधानावर संताप व्यक्त करताना डीएसपी चंडेल म्हणाले, नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मला अतीव दु:ख झालं आहे. पोलिसांविषयी त्यांनी केलेल्या विधानाचा मी पोलीस दलातर्फे, पंजाब पोलीस आणि चंदीगड पोलिसांकडून तीव्र निषेध करतो.

त्यांच्या विधानासाठी त्यांना नोटीस पाठवण्याचा देखील मी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य स्वीकारार्ह नाही. हे तेच पोलीस आहेत, जे लोकांना राजकीय नेत्यांच्या सूचना पाळायला लावतात. पोलिसांशिवाय एक साधा रिक्षावालाही या राजकीय नेत्यांच्या सूचनांचं पालन करणार नाही.

जर नवज्योत सिंग सिद्धू यांना पोलिसांबद्दल काही तक्रार असेलच, तर त्यांना मिळत असलेली पोलीस सुरक्षा त्यांनी नाकारावी. तुम्ही या विधानामुळे संपूर्ण पंजाब पोलिसांचा अपमान केला आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी यावर अद्याप कोणताही खुलासा केलेला नसला, तरी हे विधान त्यांनी विनोद म्हणून केलं होतं, असं त्यांच्या निकटवतीर्याने सांगितल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलं आहे.

Navjot Singh Sidhu’s offensive statement against the police, He said that the MLAs were so tough that the police pants would get wet due to their fear

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था