विशेष प्रतिनिधी
लखनऊ : कुणावर हल्ला करण्यासाठी नव्हे, तर आमच्या देशावर वाकडी नजर टाकण्याचे कुणाचे धाडस होऊ नये यासाठी भारत ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचे उत्पादन करू इच्छितो, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे.Production of BrahMos missiles, warns Rajnath Singh so that no one would dare to take a crooked look at the country
ब्रह्मोस उत्पादन केंद्रातील डिफेन्स टेक्नॉलॉजीज अँड टेस्ट सेंटरच्या भूमिपूजन समारंभानंतर केलेल्या भाषणात राजनाथ सिंह म्हणले, आम्ही ज्यांचे उत्पादन करत आहोत, ते ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रे कुठल्याही देशावर हल्ला करण्यासाठी नाहीत.
एखाद्या देशावर हल्ला करणे किंवा कुठल्याही देशाची एक इंचही भूमी बळकावणे हे कधीच भारताच्या स्वभावात नव्हते. कुणाची आमच्याकडे वाकडय़ा नजरेने पाहण्याची हिंमत होऊ नये यासाठी आम्ही भारतात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करत आहोत. जगातील कुठल्याही देशाने आमच्यावर हल्ला करू नये यासाठी भारताकडे आण्विक दहशत असायला हवी आणि आम्ही हे दाखवून दिले आहे.
भारतात दहशतवादी हल्ले करत असल्याबद्दल पाकिस्तानवर हल्लाबोल करताना संरक्षण मंत्री म्हणाले, त्या देशाने उरी व पुलवामात हल्ले केले. त्यानंतर आमच्या पंतप्रधानांनी एक निर्णय घेतला आणि आम्ही त्या देशाच्या हद्दीत घुसून तेथील दहशतवादी हल्ले उद्ध्वस्त केले.
ज्या वेळी हवाई हल्ल्यांची आवश्यकता होती, तेव्हा तेही आम्ही यशस्वीरीत्या केले. कुणी आमच्यावर वाकडी नजर टाकण्याची हिंमत केली, तर केवळ सीमेच्या या बाजूलाच नाही, तर पलीकडे जाऊन आम्ही त्यांच्यावर हल्ला करू शकतो असा संदेश आम्ही दिला. ही भारताची ताकद आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App