भारत- फ्रान्सच्या नौदलाचा आजपासून संयुक्त युद्धाभ्यास, अरबी समुद्रात तीन दिवस कवायत

navies of India and France will conduct a three-day exercise in the Arabian Sea from today

navies of India and France : भारत आणि फ्रान्सच्या नौदलाचा रविवारपासून अरबी समुद्रामध्ये तीन दिवसांची युद्धभ्यास सुरू झाला आहे. यावेळी प्रगत हवाई संरक्षण आणि पाणबुडीविरोधी अभ्यासासारख्या जटिल नौदल मोहिमा हाती घेण्यात येतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वरुण अभ्यासाच्या 19व्या संस्करणात दोन्ही नौदलांदरम्यान समन्वय व एकत्रित अभियान चालवण्याचे प्रदर्शन होईल. navies of India and France will conduct a three-day exercise in the Arabian Sea from today


वृत्तसंस्था

मुंबई : भारत आणि फ्रान्सच्या नौदलाचा रविवारपासून अरबी समुद्रामध्ये तीन दिवसांची युद्धभ्यास सुरू झाला आहे. यावेळी प्रगत हवाई संरक्षण आणि पाणबुडीविरोधी अभ्यासासारख्या जटिल नौदल मोहिमा हाती घेण्यात येतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वरुण अभ्यासाच्या 19व्या संस्करणात दोन्ही नौदलांदरम्यान समन्वय व एकत्रित अभियान चालवण्याचे प्रदर्शन होईल.

ते म्हणाले की, भारतीय नौदल गाइडेड मिसाईल फ्रिगेट, तरकश आणि तलवार, ताफ्यातील सहायक पोत दीपक, एक कलवरी श्रेणीची पाणबुडी आणि लांब पल्ल्याचे पी-8 आय सागरी गस्तीवरील विमानाचा ताफा तैनात करणार आहे.

राफेल एम या लढाऊ विमानासोबत वाहक चार्ल्स डी गाऊले, ई2सी हॉकआय विमान आणि हेलिकॉप्टर काएमॅन एम तसेच दाऊफिन फ्रान्स नौदलाचे प्रतिनिधित्व करेल. फ्रान्सचे नौदल हवाई रक्षा विध्वंसक शेवेलियर पॉल, फ्रिगेट प्रोवेन्स आणि पोत वॉरलाही तैनात करणार आहे.

वेस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल अजय कोचर हे भारतीय संघाचे नेतृत्व करतील आणि फ्रान्सच्या बाजूने कमांडर टास्क फोर्स 473 रिअर अॅडमिरल मार्क औसेदात नेतृत्व करतील.

navies of India and France will conduct a three-day exercise in the Arabian Sea from today

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात